शर्मिष्ठा राऊतच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, ऍनिव्हर्सरी पार्टीला लावले ‘या’ कलाकारांनी ‘चार चाँद’


बिग बॉस मराठी‘ हा शो मराठीत सुरू झाला आणि सर्वत्र या शोची चर्चा रंगू लागली. पहिल्यांदा मराठीत सुरू झालेल्या या शोला प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला. शोमधील सगळेच स्पर्धक अतरंगी होते. परंतु शोमध्ये आलेली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री देखील मजेशीर होती. यामध्ये अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली. ती बिग बॉसच्या इतिहासातील पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक होती, जी फिनालेपर्यंत गेली होती. ती हा शो जिंकू शकली नाही परंतु तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निभावले.

बिग बॉसच्या घरात शर्मिष्ठा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. तिचा नुकताच घटस्फोट झाला होता. ती एकटीच आयुष्य जगत होती. अशातच मागच्या वर्षी तिने दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधली. तिच्या लग्नाचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच शनिवारी (२५ डिसेंबर) रोजी तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त तिने पार्टी ठेवली होती. या पार्टीत बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचे सगळे स्पर्धक सामील झाले होते. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली होती. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. (Sharmistha raut celebrate her first anniversary with marathi actors)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, या पार्टीत उषा नाडकर्णी, स्मिता गोंदकर, मेघा धाडे, आस्ताद काळे, सुशांत शेलार, शिव ठाकरे, रेशम टिपणीस, सुप्रिया पाठारे, वंदना गुप्ते यांसारखे अनेक कलाकार सामील झाले होते.

शर्मिष्ठा राऊतचे पहिले लग्न अमेय निपाणकर याच्याशी लग्न झाले होते. परंतु काही वैयक्तिक कारणांवरून त्यांचा घटस्फोट झाला. तिने २५ डिसेंबर २०२० साली तेजस देसाई याच्याशी थाटामाटात विवाह झाला आहे.

शर्मिष्ठाने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘चि. व चि. सौ. का.’, ‘योद्धा’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा जास्त लोकप्रिय आहे ही चिमुकली, आज बनलीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठ्ठं नाव

ठरलं तर! ‘वेलकम ३’मध्ये पुन्हा कॉमेडीचा तडका लावणार नाना पाटेकर, अनिल कपूर अन् परेश रावल

‘आजपर्यंत माझ्यासोबत असे घडले नाही’, ‘८३’ रिलीझ झाल्यानंतर रणवीरने केला मोठा खुलासा 

 

 


Latest Post

error: Content is protected !!