Wednesday, April 17, 2024

ठरलं तर! ‘वेलकम ३’मध्ये पुन्हा कॉमेडीचा तडका लावणार नाना पाटेकर, अनिल कपूर अन् परेश रावल

बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी सिरीज ‘वेलकम’च्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि परेश रावल  (Paresh Rawal) पुन्हा एकदा कॉमेडीचा टच देताना दिसणार आहेत. यापूर्वी २००७ मध्ये या सिरीजचा ‘वेलकम’ आणि २०१५ मध्ये त्याचा सिक्वेल ‘वेलकम बॅक’ आला होता जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

माध्यमांतील वृत्तानुसार, ‘वेलकम ३’चे शूटिंग २०२२च्या अखेरीस सुरू होईल. सध्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. या चित्रपटासाठी नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल यांची नावे निश्चित झाल्याचे मानले जात असले, तरी अन्य कलाकारांच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. हा एक ऍक्शन कॉमेडी चित्रपट असेल.

ओरिजनल चित्रपट ‘वेलकम’ आला होता २००७ मध्ये
हा चित्रपट १९९९ मध्ये आलेल्या ‘मिकी ब्लू आईज’ या कॉमेडी चित्रपटाचे हिंदी रूपांतर होते. ‘वेलकम’ २००७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षय कुमार (Akshay Kumar), कॅटरिना कैफ (Katrina Kaif), अनिल, नाना आणि परेश यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात जबरदस्त मजा आली. सर्व कलाकार त्यांच्या स्टाईलने प्रभावित झाले. या चित्रपटात दिवंगत अभिनेते फिरोज खान देखील दिसले होते. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ‘आरडीएक्स’ या व्यक्तिरेखेने चित्रपटाला जीवनदान दिले. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले होते.

‘वेलकम २’मध्ये जॉन अब्राहम स्टारकास्टचा होता भाग
यानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग आला, जो ‘वेलकम’चा सिक्वेल होता. मात्र या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी जॉन अब्राहमला (John Abraham) आणि कॅटरिना कैफच्या जागी जागी श्रुती हासनला (Shruti Haasan) कास्ट करण्यात आले होते. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि नसीरुद्दीन शाह देखील काम करताना दिसले होते. हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आणि बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करणाऱ्या हिट चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आला. अनीस बज्मी यांनी याचे दिग्दर्शन केले होते.

अलीकडेच ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटात अनिल कपूर यांची एन्ट्री झाली आहे. ‘जुग जुग जिओ’मुळेही ते चर्चेत आहेत. अनिल ‘पशु’ या चित्रपटातही दिसणार आहे. परेश रावल ‘शर्मा जी नमकीन’ या चित्रपटात दिसणार आहेत. ऋषी कपूर यांचा हा शेवटचा चित्रपट आहे, ज्यात त्यांनी मृत्यूपूर्वी काम केले होते. परेश यांचे नाव ‘शेहजादा’ चित्रपटाशीही जोडले गेले आहे. त्याचवेळी नाना प्रकाश राज यांच्या ‘तडका’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा