Monday, June 24, 2024

‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगले ‘नॉकआउट’ नॉमिनेशन कार्य, कोण होणार या आठवड्यात नॉमिनेट?

 

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात अनेक घडामोडी घडत आहेत. घरातून नुकतीच दादूस म्हणजेच संतोष चौधरी यांची एक्झिट झाली असून, त्यामुळे घरात आता केवळ ८ सदस्य उरले आहेत. त्या आठ सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होताना दिसत आहे. सगळेजण आता ट्रॉफीच्या दिशेने प्रवास करत असून, आपल्या मित्रांना मागे सारून सगळेच पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच घरात या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क रंगला.

या आठवड्यात घरात ‘नॉकआउट’ हे नॉमिनेशन कार्य होणार आहे. यात गार्डनमध्ये टेबलावर घरातील सगळ्या सदस्यांच्या नावाचे पुस्तक ठेवले आहे. घरातील सगळ्यांना इतरांच्या नावाचे पुस्तक मिळवायचे आहे. यावेळी घरातील सगळेच ज्या व्यक्तीला नॉमिनेट करायचे आहे, त्यांच्या नावाचे पुस्तक घेण्याचा प्रयत्न करतात. यावेळी विशाल आणि उत्कर्ष एकमेकांकडे बघून खुनवा-खुनवी करताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 3 : knowk out nomination task are in BBM house)

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा हा प्रोमो पाहून सगळे असा अंदाज लावत आहेत की, उत्कर्ष आणि विशालने काहीतरी प्लॅनिंग केले आहे. कारण मागील आठवड्यात विशाल आणि ‘बी’ टीममध्ये खूप वाद झाले. विशाल हा मीनल, विकास आणि सोनाली यांच्याशी बोलत नाही. तसेच वीकेंडला सोनाली आणि त्याच्यामध्ये खूप वाद झाले. त्यामुळे आता विशाल, उत्कर्ष आणि जयसोबत काही डील करत आहे असे सगळ्यांना वाटत आहे.

तसेच नॉमिनेशन टास्कमध्ये जय हा संचालक असून, त्याला गायत्री आणि विकासचे भांडण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच मीरा देखील विकाससोबत काही प्रमाणात भांडताना दिसते. हाती आलेल्या माहितीनुसार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात फॅमिली विक होणार आहे. घरातील स्पर्धकांना १०० मिनिट देण्यात येणार आहे. स्पर्धकांना ठरवून ते १०० मिनिट विभागून घ्यायचे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा