नॉमिनेशन कार्यात सोनाली आणि जयमध्ये उडाला भडका, टीमला मदत केल्याचा लावला आरोप


‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला टॉप १० स्पर्धक मिळाले आहेत. या आठवड्यात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री निथा शेट्टी ही घराबाहेर गेली. केवळ दोन आठवड्यांचा तिचा हा प्रवास होता. घरात आठवा आठवडा चालू झाला आहे. हा खेळ आता आणखीनच अवघड होत चालला आहे. घरात एलियनने कब्जा केला आहे. तसेच घरात आता नॉमिनेशन टास्क रंगला आहे.

यावेळी घरात एलियनने कब्जा मिळवला आहे, त्यामुळे त्याच्या यानात गॅस भरण्यासाठी घरात गॅसचा टास्क रंगला आहे. यावेळी घरातील प्रत्येक सदस्याला तीन इंधनाच्या बॉटल घ्यायच्या असतात. टास्कमध्ये एक बॉटल कमी असते, त्यामुळे ज्या स्पर्धकाकडे एक बॉटल कमी तो या टास्कमधून बाहेर जाऊन नॉमिनेट होणार असतो. यावेळी जय हा या कार्याचा संचालक असतो. तसेच, स्नेहा आणि सोनाली हे आधीच नॉमिनेट होते. त्यामुळे त्या या खेळात नव्हत्या. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between jay dudhane and sonali patil)

या टास्कदरम्यान जय हा त्याच्या टीमला मदत करत होता. तसेच, मीरा आणि उत्कर्ष यांना प्लॅनिंग सांगत होता. यावर सोनाली खूप भडकते आणि त्याला म्हणते की, “तू संचालक आहेस त्यांचे त्यांना प्लॅनिंग करू दे, तू मधे बोलू नकोस.” यावरून त्यांच्यात खूप वाद होतो.

या कार्यात सगळ्यांना त्यांच्या बॉटल वाचवायच्या असतात. या कार्यात केवळ विशाल, विकास आणि मीनल हे विजयी होतात, तर बाकी, उत्कर्ष, मीरा, गायत्री, दादूस, स्नेहा, सोनाली हे नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल याची सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, विशाल, विकास आणि मीनल यांनी खूप चांगला गेम खेळला याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ऋता दुर्गुळे दिसतीये अगदी प्रिन्सेस, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

-‘सहजीवनाची २४ वर्ष…’, म्हणत समीर चौगुलेने पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

-चंगू-मंगुची ही जोडी तुटेल का? वादानंतर अजूनही मीनल आणि विशालमध्ये अबोला कायम


Latest Post

error: Content is protected !!