Thursday, March 28, 2024

‘सहजीवनाची २४ वर्ष…’, म्हणत समीर चौगुलेने पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या अभिनयाने आणि विनोदाने सर्वांना खळखळून हसवण्यासाठी अनेक कलाकार नेहमीच सज्ज असतात. अनेक विनोदी कार्यक्रम टेलिव्हिजनवर चालू असतात. अशीच प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात नेऊन सोडणारा सोनी मराठी वरील विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. यातील सगळेच कलाकार एका पेक्षा एक अव्वल आहेत. यातील एक कलाकार म्हणजे समीर चौगुले. तो या शोमध्ये काम करून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे. समीरने त्याच्या वैवाहिक जीवनाचे २४ वर्ष पूर्ण केले आहेत. या निमित्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसोबत फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

समीर चौगुलेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी त्याने पत्नीसोबत फोटो शेअर केला आहे. (Sameer chaugule give best wishes to his wife on their 24 th anniversary)

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “सहजीवनाची २४ वर्ष. स्ट्रगलच्या काळात मी आहे नको काळजी करुस असे खंबीरपणे म्हणणारी आणि किंचित यशाने हुरळून जाऊन माझी पतंग हवेत उडायला लागल्यावर जरा थांब म्हणून मला जमिनीवर उतरणारी. खूप धन्यवाद आणि खूप प्रेम.”

त्याने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक चाहते तसेच कलाकार देखील कमेंट करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या फोटोवर अभिनेत्री रुजुता देशमुख हिने “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा समीर आणि कविता” अशी कमेंट केली आहे तसेच प्रसाद ओकने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

समीर चौगुलेने अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘विकून टाक’, ‘लव्ह लफडे’, ‘ए पेईंग होस्ट’, ‘आजचा दिवस माझा’, ‘कायद्याचे बोला’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा