‘बिग बॉस मराठी’च्या घरात येऊन स्पर्धकांना आता ७० दिवस होऊन गेले आहेत. दर आठवड्यात घरातील एका स्पर्धकाने निरोप घेतला आहे. घरात आता नऊरत्न राहिले होते. त्यातील नुकतेच या आठवड्यात एका व्यक्तीचे एलिमिनेशन झाले आहे. घरात सुरवातीपासूनच एका व्यक्तीचा सगळ्यांना खूप लळा लागला होता. ती व्यक्ती म्हणजे संतोष चौधरी म्हणजेच सगळ्यांचे लाडके दादूस. बिग बॉसच्या घरात त्यांनी मायेने आपुलकीने सगळ्यांना जवळ केले. अशातच आठव्या आठवड्यात ते घराबाहेर गेले आहेत.
दादूस यांची जेव्हा घरात एन्ट्री झाली, तेव्हा ते मुख्य आकर्षण ठरले होते. याचे कारण म्हणजे ते येताना तब्बल दोन किलो सोनं घालून आले होते. आगरी कोळी समाजातील अनके गाणी त्यांनी गायली आहेत. तसेच बिग बॉसच्या घरात देखील त्यांनी घरातील सदस्यांचे आणि प्रेक्षकांचे देखील मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले होते. त्यांची गाणी सगळ्यांना आवडत होती.
या आठवड्यात मीरा, सोनाली, मीनल, विकास, दादूस हे नॉमिनेट होते. यात शेवटी मीरा आणि दादूस हे डेंजर झोनमध्ये होते. यावेळी जास्त व्होटिंग असल्यामुळे मीरा सेफ होते आणि दादूस घराबाहेर जातात. जाताना ते केवळ त्यांच्या नावाची पाटी घेऊन जातात. त्यानंतर ते स्टेजवर येतात यावेळी मांजरेकर त्यांना त्यांचा घरातील सगळा प्रवास दाखवतात. घरातून बाहेर जाताना त्यांना देखील खूप त्रास होत होता. परंतु त्यांनी जड अंतकरणाने सगळ्यांना निरोप दिला.
दादूस यांचे एकंदरीत वय पाहता त्यांनी खूप चांगल्याप्रकारे खेळ खेळला. तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे देखील त्यांना भरपूर प्रेम मिळाले. घरात त्यांची सुरेखा, तृप्ती आणि स्नेहा यांच्याशी खूप चांगली गट्टी जमली होती, स्नेहाला ते त्यांच्या मुलीप्रमाणे मनात होते. मागील आठवड्यात जेव्हा स्नेहा घराबहर गेली तेव्हा देखील त्यांना खूप दुःख झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा
-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?