छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त, पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. भांडणतंटे, वादविवाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. ‘बिग बॉसच्या मराठी’च्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्याच आठवड्यात राखी सावंत हिने वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला.
एंटरटेनमेंटचं फूल पॅकेज असलेली राखी सावंत (rakhi sawant) ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासूनच चर्चेत राहण्यासाठी ड्रामा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात राखी सावंतने जाेरदार ड्रामा केला आहे. ज्याचा व्हिडिओ नुकताच समाेर आला आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस’च्या घरात राखी व इतर सदस्य बसलेले दिसत आहेत. यावेळी राखीने मंजुलिकेचा लूक करून सगळ्यांनाचा आश्चर्य केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, राखी म्हणते, “अरे! काय मला बघताय? काेंबडी पाठवा मटण पाठवा माझ्यासाठी.” पुढे राखी म्हणते, “अरे, आज नाॅमिनेशन आहे ना… म्हणून मी अशी तयार झाली आहे.” राखीचा हा व्हिडीओ ‘बिगबाॅस मराठी’च्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “घरामध्ये राखीचा ‘चंद्रमुखी’ अवतार पाहून सदस्यांनी घेतली मजा!” हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. चाहते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहे.
View this post on Instagram
यासाेबत राखीच्या अंगातला भूत काढण्यासाठी किरण मानेंनी काही मजेदार प्रयत्न केले आहेत. जे पाहून साेशल मीडिया युजर्स हसण्यावर कंट्राेल करू शकत नाहीय. त्यामुळे हा एपिसाेड पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत. (bigg boss marathi 4 rakhi sawant comedy video)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! विद्या बालनसोबत घडला विचित्र प्रकार, पती सिद्धार्थसमोर पुरुषाने पकडला अभिनेत्रीचा पदर अन्…
सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भुरळ