Tuesday, June 18, 2024

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती

आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मनोरंजनविश्वातील सर्वच कलाकार सोशल मीडियाचा आधार घेत असतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या फॅन्ससोबत संपर्कात राहता येते तर फॅन्सला कलाकारांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात काय घडते हे समजून घेता येते. मात्र कधी कलाकार देखील या सोशल मीडियाला कंटाळता आणि सोशल मीडिया सोडतात. कधी कलाकार कायमस्वरूपासाठी हा निर्णय घेता तर काही थोड्या कालावधीसाठी. सोशल मीडियापासून लांब जात कलाकारांना त्यांच्या मनासारखे काहीतरी वेगळे करायला देखील आवडते. म्हणूनही अनेक कलाकार हा निर्णय घेतात. आता पर्यंत असे अनेक कलाकारांनी केले आहे. आता मराठीमधील एका अभिनेत्रीने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.

मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये आपली चुणूक दाखवलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. सई मधल्या काही काळापासून मालिका चित्रपटांपासून लांब असली तरी ती सतत सोशल मीडियावर सक्रिय होती. या माध्यमातून ती तिच्या फॅन्ससोबत जोडलेली देखील होती. मराठी बिग बॉसनंतर सईच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. सईने लग्नानंतर मनोरंजनविश्वपासून लांब राहणेच पसंत केले. या दरम्यान ती सतत तिचे रिल्स व्हिडिओ पोस्ट करत होती. मात्र आता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती काही दिवस सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचे सांगितले आहे.

सईने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “मला मागील अनेक दिवसांपासून एक गोष्ट करायची होती आणि अखेर आता मी ते करणार आहे. मी पुढील काही दिवस इन्स्टाग्रामपासून ब्रेक घेणार आहे. हा ब्रेक घेण्याची मला अत्यंत गरज आहे. मला स्वत:साठी हे करणे गरजेचे वाटत आहे. त्यामुळे मी आता काही दिवस सोशल मीडियावर नसेल. मी पुन्हा सोशल मीडियासाठी तयार झाले की नक्की येईल. सोबतच तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. खूप प्रेम. सई”.

सईच्या या पोस्टवर अनेकांनी तिला तिने हा निर्णय का घेतला? काय झाले? ती पुन्हा केव्हा येणार? असे अनेक प्रश्न विचारले आहेत. मात्र सईने काहीच जास्त माहिती दिली नाही. तत्पूर्वी सईने अनेक पारंबी, नो एन्ट्री पुढे धोका आहे, जरब, मी आणि यू, किस किसको प्यार करु आदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा