Tuesday, July 9, 2024

Bigg Boss OTT: चक्क ‘मीठाच्या डब्ब्यावरून’ जुंपली शमिता अन् अक्षरात जोरदार भांडणं; तर नेटकरी ‘हिला’ म्हणाले ‘घमंडी’

‘बिग बॉस ओटीटी’ दुसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. एकीकडे घरातील अनेक नातेसंबंध जुळताना आणि बिघडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, शमिता शेट्टी आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग यांच्यात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात दोघींमध्ये स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यावरून भांडण झाले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये मीठावरून जोरदार वाद झाला. दरम्यान कुटुंबातील सदस्यही या दोघींमधील भांडण शांत करण्यासाठी पोहोचले.

मीठाच्या डब्ब्यावरून झाला वाद
शमिता आणि अक्षरा यांचे भांडण कसे सुरू झाले हे उघड झाले नाही. परंतु अलीकडेच एक प्रोमो समोर आला, जे पाहून हे स्पष्ट होते, की या दोघींमधील हा वाद स्वयंपाकघरातील वस्तूंवरून होत आहे. खरंतर अक्षरा आणि शमिता यांच्यातील हे भांडण चक्क मीठाच्या डब्ब्यावरून होत आहे. या व्हिडिओमध्ये भोजपुरी अभिनेत्री शमिताला सांगताना दिसत आहे, की शमिता तिच्याशी कशी बोलली हे सर्व कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे.

ओरडताना दिसली शमिता शेट्टी
अक्षरा सिंगचे बोलणे ऐकल्यानंतर शमिता तिच्यावर ओरडून तिला म्हणते की, “मी तुझी नोकर आहे का?” यावर उत्तर देताना अक्षरा म्हणाली, “की मी स्वयंपाक करत आहे, म्हणून मी नोकर आहे.” अक्षराचे हे बोलणे ऐकल्यानंतर, शमिता तिच्यावर ओरडत पुन्हा पुन्हा तोच शब्द उच्चारताना दिसते. शमिता सतत ‘किचन माझे आहे का’ असे म्हणताना दिसते.

राकेशने शांत केला वाद
शमिता शेट्टीकडून सतत तेच तेच ऐकून, अक्षरा सिंगनेही तिच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. ती म्हणाली ‘मी फक्त तुला विचारत आहे’. या दोघांमधील ही वाढती झुंज पाहिल्यानंतर राकेश बापट मध्ये आला आणि त्याने त्यांच्यातील हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर शमिताला म्हटलं जातंय ‘घमंडी’
घरात झालेल्या शमिता आणि अक्षराच्या भांडणानंतर नेटकरी सोशल मीडियावर शमितावर निशाणा साधताना दिसत आहेत. तर या वादामध्ये नेटकरी भोजपुरी अभिनेत्रीला पाठिंबा देत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “शमिता आंटी खूप त्रासदायक आहे.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “शमिता घमंडी झाली आहे.”

अक्षरा सिंग म्हटली होती ‘मौसी’
अक्षरा सिंगला सुरुवातीपासूनच शमिता शेट्टी आवडत नाही, हे शोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एका एपिसोडमध्ये, अक्षरा सिंग उर्फी जावेदसह बोलत होती आणि शमिता शेट्टीला ‘मौसी’ म्हणून हाक मारत होती. अक्षरा उर्फीशी बोलताना असेही म्हणाली, की तिला कल्पना नव्हती की, शमिता शेट्टी ४२-४३ वर्षांची आहे आणि इंडस्ट्रीमध्ये इतकी जुनी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा