नुकताच लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉसचा 16’ सिजन चाहत्यांच्या भेटीला आला आहे. यामध्ये पहिल्याच भागात अनेक कलारांची एकमेकांशी वाद होताना दिसून येत आहे. स्पर्धकांनी आपला गेम समजून घेतला आसून पहिल्याच दिवशी कामाबद्दलचा पाहायला मिळाला आहे. या सिजनमध्ये बिग बॉसने खूपच बदल केले आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा तोडली आहे. हा सिजन बाकीच्या सिजनपेक्षा खूप वेगळा असून काटेकोर नियम ठेवले आहेत. सोमवारी (दि. 3 सप्टेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये सगळ्यांना धक्का देणारे निर्णय समोर आले.
बिग बॉसच्या पहिल्याच भागात काही स्पर्धक चांगलेच भिडताना दिसून आले. त्यामुळे या घरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यामध्येच बिग बॉसचा नवीन निर्णय ऐकूण सगळ्यांच्याच तोंडचे पाणि पळाले आहे. बिग बॉसने यावेळेसचे कायदे खूपच कडक बनवले आहेत. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी नॉमिनेशनच्या प्रक्रिया सांगून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘बिग बॉसने सांगितले की, प्रत्येकजन दोन स्पर्धकांची नावे नॉमिनेशनसाठी देणार आणि याच्या मागे कोणतेच वायफळ कारण सांगायचे नाहीत.’बिग बॉसच्या आदेशानुसार प्रत्येक स्पर्धकाने दोन नावे नॉमिनेशनसाठी सांगितले.
या झालेल्या प्रक्रियेत प्रत्येकाने आपला सूड घेत स्पर्धकांची नावे सांगितली, साजिद खान (Sajid Khan), शिव ठाकरे ( Shiv Thakry) , अर्चना गौतम (Archana Gautam), गोरी नागोरी (Gori Nagori), गौतम विग (Gautam vig) आणि अब्द रोजिक (Abdu Rozik) या कलाकारांची नावे समोर आली आहेत. घराची प्रमुख म्हणजेच निमरत कौरल असल्याने तिला या नॉमिनेशनपासून वाचण्याचा विशेष अधिकार दिला असूण ती ज्या दोन स्पर्धकांची नावे नॉमिनेशनला सांगेल ती त्या स्पर्धकांना लगेच नॉमिनेट केले जाईल.
निमरितने संधीचा फायदा घेत अर्चना आणि शिव या दोन स्पर्धकांना नॉमिनेशन केले. श्रीजिता डे हिने आपली मैत्रिण टीना आणि गोरी नागारी यांना नॉमिनेट केले आहे. शालीन भनोटा, टीना दत्त, प्रियंका आणि बाकीच्या स्पर्धकांनी साजिद खान, मान्या सिंह आणि अब्दुल याचे नाव नॉमिनेटसाठी घेतले. या सोबतच झालेल्या नॉमिनेशनवर साजिदचे प्रतिक्रिया लक्षात घेऊन बिग बॉसने सांगितले की, नॉमिनेशन प्रक्रिया टीव्ही वर्सेस बॉलिवूड प्रभावित असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे बाप! अभिनेत्री काजोलने घेतला जया बच्चन यांच्याशी पंगा, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडमध्ये ‘या’ जोडप्याच्या प्रेमाच्या अनेक चर्चा रंगूनही वर्षभरातच घेतला घटस्फोट, जाणून घ्या एका क्लीकवर