Tuesday, April 23, 2024

जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची इच्छा

जवळपास सात दशकं आपल्या करिअरमध्ये अभिनय, नृत्य, थिएटर यामध्ये काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी, पृथ्वीराज कपूरपासून ते त्यांची चौथी पिढी रणबीर कपूरसोबत काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे जोहरा सेहगल. आज त्यांची पुण्यतिथी आहे. वयाच्या १०२ व्या वर्षी या जगाचा अंतिम दर्शन घेणाऱ्या जोहरा यांनी त्यांच्या करिअरच्या कारकीर्दीत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांचा जन्म २७ एप्रिल १९१२ रोजी सहारनपुरमध्ये पठाण मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव साहेबजादी जोहरा बेगम मुमताज उल्ला खान हे होते. त्यांचे वडील मुमताज उल्ला खान आणि आई नातिका उल्ला खान हे उत्तरप्रदेशमधील रामपूर येथील रहिवासी होते. (Death anniversary : actress johara Sahgal who woked with prithviraj kapoor to ranbir kapoor )

त्यांच्या आई-वडिलांना ७ अपत्ये होती. त्यातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रतिभावंत अपत्य म्हणजे जोहरा. नृत्य करण्यात आवड असल्याने त्यांनी अनेक रंगमंच गाजवले आहेत. त्यांनी त्यांच्या तारुण्यापासून ते म्हातारपणापर्यंत चित्रपटसृष्टीत काम केले. त्या एकमेव अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी पृथ्वीराज कपूरपासून अमिताभ बच्चन ते रणबीर कपूरसोबत काम केले आहे.

जोहरा सहगल यांनी ‘चिनी कम’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘दिल से’, ‘वीर जारा’ यांसारख्या हिंदी चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली आहे. त्यांनी २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटात शेवटचे काम केले होते.

जोहरा सेहगल यांनी ‘चिनी कम’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका निभावली होती. २०१२ मध्ये जेव्हा त्या १०० वर्षांच्या झाल्या होत्या, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांना १०० वर्षांची मुलगी असे म्हटले होते. ते म्हटले होते की, “त्या एक छोट्या लहान मुलीप्रमाणे आहेत. या वयातही त्यांची ऊर्जा बघण्यासारखी आहे. मी त्यांना कधीच उदास पाहिले नाही. त्या नेहमीच हसत असतात.”

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ‘चिनी कम’ चित्रपटाच्या सेटवर त्या नेहमी सर्वांना जुन्या गोष्ट सांगत असायच्या. बीबीसीसोबत बोलताना त्यांनी सांगितले होते की, “जोहरा जी पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी या थिएटरसोबत जोडलेल्या होत्या. पृथ्वीराज यांचे माझ्या वडिलांशी खूप जवळचे संबंध होते. जेव्हा ते त्यांच्या नाटकासंदर्भात इलाहाबादला येत असायचे तेव्हा आमची जोहरा यांच्याशी भेट होत असत.”जोहरा सेहगल यांना १९९८ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये कालिदास सन्मान, २००४ मध्ये संगीत नाटक अकादमी यासारखे पुरस्कार मिळाले होते. संगीत नाटक अकादमीने त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डवर फेलोशिप देखील दिली होती. २०१० मध्ये त्यांना देशातील सर्वात मोठ्या दुसरा नागरिक ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार मिळाला होता. १० जुलै २०१४ रोजी त्यांना हॉस्पिटलमध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी शेवटाचा श्वास घेतला. त्यांनी त्यांची शेवटची इच्छा मजेशीर सांगितली होती. त्यांनी सांगितले होते की, “माझा मृत्यू झाल्यानंतर मला जळल्यावर माझी राख फ्लश करा.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा