ओम प्रकाश (Om Prakash) यांनी जवळपास ३० वर्षे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कोणत्याही चित्रपटात आपल्या अभिनयाने जीव ओतून पात्र साकारणाऱ्या ओम यांचे पूर्ण नाव ओम प्रकाश छिब्बर होते. नाट्यक्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याला शास्त्रीय संगीताचीही जाण होती, हे फार कमी लोकांना माहीत असेल. ते जम्मूचे प्रसिद्ध दिवाण मंदिर नाटक समाजाच्या नाटकांमध्ये भाग घेत असत. अभिनेते ओम यांची रविवारी (१९ डिसेंबर) जयंती आहे.
ओम यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ रोजी जम्मू येथे झाला. त्यांनी १९५० ते १९८० या काळात सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. ‘शराबी’, ‘नमक हलाल’, ‘चुपके चुपके’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले ओम यांच्या प्रेमविवाहाचे आणि त्यांच्या जयंतीदिनी पहिला चित्रपट मिळाल्याचे मनोरंजक किस्से जाणून घेऊया.
एका शीख तरुणीसोबत होते प्रेमसंबंध
जम्मूच्या एका उच्चभ्रू कुटुंबातील ओम संगीताच्या प्रेमापोटी ऑल इंडिया रेडिओवर रुजू झाले. ओम इथे फक्त गाणेच नाही, तर अभिनयही करत असे. पगार २५ रुपये दरमहा होता, जो त्या काळात जास्त मानला जात होता. रेडिओवर ओम यांच्या कार्यक्रमाचे अनेक चाहते होते. यादरम्यान ते एका शीख तरुणीच्या प्रेमात पडले. ओम यांनी त्यांच्या चरित्रात सांगितले आहे की, दररोज त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर ते त्यांना भेटायचे आणि दोघेही फिरायला जायचे. ओम यांना या प्रेमाचे लग्नात रूपांतर करायचे होते.
दरम्यान, ओम यांची आई आजारी पडली आणि तिला आपल्या मुलांचे लग्न बघायचे होते, मात्र ओमच्या मोठ्या भावाने लग्नास नकार दिला. त्यामुळे आईने तू लग्न कर असे सांगितले. घरातल्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगण्याइतकी हिम्मत त्यांच्यात नव्हती. ते हिंदू असल्यामुळे त्या मुलीचे कुटुंबीय अभिनेत्याच्या विरोधात होते.
एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हते लग्न
ओम यांच्या लग्नाची कथाही कमी फिल्मी नाही. ओम यांच्या म्हणण्यानुसार, “एक दिवसाची गोष्ट होती की, मी पान दुकानावर उभा होतो. एक महिला माझ्याकडे आली आणि म्हणाली ती विधवा आहे, तिला ४ मुली आहेत. मला तिचा जावई बनवायचा आहे आणि मी माझ्या आईशी याबद्दल बोललो. त्यांनी माझ्यासमोर मांडीवर पसरून विनंती केल्यावर मी भावूक होऊन लग्नाला होकार दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या प्रेयसीला भेटलो आणि तिला संपूर्ण हकीकत सांगितली आणि म्हणालो की, हे ठीक होईल, कारण तसही तुझ्या घरच्यांना मी आवडत नाही. हे ऐकताच डोकं धरून ती तिथेच रस्त्यात बसली, काही वेळ बसली आणि मग तिच्या घरी गेली. ती पण माझ्या लग्नाला आली होती.”
चित्रपटात काम मिळाल्याचा मनोरंजक किस्सा
ओम यांनी १९४२ मध्ये चित्रपट जगतात प्रवेश केल्याची कहाणीही काही कमी मनोरंजक नाही. ओम यांचे बोलणे आणि बोलण्याची शैली त्यांना इतरांपासून वेगळे करत असे. असे म्हटले जाते की, ओमप्रकाश एका लग्नाच्या पार्टीला गेले होते. त्याचवेळी चित्रपट दिग्दर्शक दलसुख पांचोलीची नजर ओमवर पडली. पांचोलीने त्याला आपल्या कार्यालयात येण्यास सांगितले आणि ‘दासी’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. ओम या यशस्वी रंगभूमी कलाकाराने आपल्या पहिल्याच चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली. यानंतर त्यांना चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. आपल्या चित्रपट कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन करणारे ओम प्रकाश यांनी १९ फेब्रुवारी १९९८ रोजी जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा-