पार्टीत मिळाली होती चित्रपटाची ऑफर, तर एका मुलीची आई आहे अविवाहीत माही गिल

माही गिल (Mahie Gill) या अभिनेत्रीला हिंदी चित्रपटसृष्टीत काम करून १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. यादरम्यान माहीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक व्यक्तिरेखा साकारल्या, मग ती ‘देव डी’ चित्रपटाची पारो असो किंवा ‘साहेब बीवी और गँगस्टर’ चित्रपटातील माधवी देवी. माही रविवारी (१९ डिसेंबर) तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘साहब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स’, ‘पान सिंग तोमर’ यांसारख्या चित्रपटांमधून तिला ओळख मिळाली. चला, तर मग माहीच्या वाढदिवशी तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेऊया…

View this post on Instagram

A post shared by Mahie Gill (@mahieg)

‘हे’ आहे माही गिलचे खरे नाव
माहीचा जन्म १९ डिसेंबर १९७५ रोजी चंदीगडमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. अभिनेत्रीचे खरे नाव रिम्पी कौर गिल आहे. माही गिल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीचे लग्न झालेले नाही, पण तिला एक मुलगी आहे. ती मुलगी आणि बॉयफ्रेंडसह गोव्यात राहते.

View this post on Instagram

A post shared by Mahie Gill (@mahieg)

माहीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला वेरोनिका नावाची मुलगी आहे. लग्न ही वैयक्तिक पसंती असल्याचे सांगून माही म्हणाली होती, “लग्न करून काय करायचे? लग्नाची गरज काय? हे सर्व आपल्या विचार आणि वेळेवर अवलंबून असते. लग्नाशिवायही कुटुंब आणि मुले असू शकतात.”

View this post on Instagram

A post shared by Mahie Gill (@mahieg)

बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपच्या ‘देव डी’मधून मिळाली ओळख
माहीने बॉलिवूडपूर्वी पंजाबी चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिला पहिला ब्रेक २००३ मध्ये ‘हवाए’ चित्रपटातून मिळाला. पंजाबी चित्रपटसृष्टीतील ते एक मोठे नाव आहे. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ या चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. यानंतर माहीला बॉलिवूडमध्ये अनेक ऑफर्स मिळू लागल्या. ‘देव डी’ या चित्रपटानंतर माहीने अनेक पुरस्कारही जिंकले.

View this post on Instagram

A post shared by Mahie Gill (@mahieg)

अनुराग कश्यपच्या ‘देव डी’मध्ये पारोची भूमिका साकारून माहीने खूप प्रशंसा मिळवली होती. माध्यमांतील वृत्तानुसार, अनुराग कश्यपने तिला एका पार्टीत पाहिले आणि त्यानंतरच तिला पारोच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले.

काही बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर, माही ‘साहब, बीवी और गँगस्टर’मध्ये जिमी शेरगिल आणि रणदीप हुड्डासोबत दिसली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर तिने आणखी काही चित्रपट केले.

View this post on Instagram

A post shared by Mahie Gill (@mahieg)

पार्टीत डान्स करताना चित्रपटात मिळाला ब्रेक
माहीला अनुराग कश्यपने एका बर्थडे पार्टीत पाहिले जेथे ती डान्स परफॉर्मन्स करत होती. माहीने एका मुलाखतीत सांगितले होते की, वाढदिवसाच्या पार्टीत ती चार तास डान्स करत होती, तिथे अनुराग कश्यपही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माहीला नोटिस केले आणि त्यांचा ‘देव डी’ चित्रपट साइन केला.

View this post on Instagram

A post shared by Mahie Gill (@mahieg)

तिग्मांशु धुलियाच्या ‘बुलेट राजा’ या चित्रपटात माहीने पहले आयटम साँग केले होते. माहीला स्वयंपाक करायला खूप आवडतो. तिला नॉनव्हेज खाण्याची खूप आवड आहे. माहीने एकदा सांगितले होते की, तिला लाँग ड्राईव्हवर जाणे आवडते आणि ती खूप प्रवास करते.

हेही वाचा-

Latest Post