Saturday, July 6, 2024

क्रिकेटपटू, मॉडेल, अभिनेता अन् उत्कृष्ठ शेफ! वाचा बहूप्रतिभावान अंगद बेदीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

हिंदी चित्रपट क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी दुसर्‍या क्षेत्रात काम केले आहे. मात्र क्रिकेटमध्ये सामने खेळून पुन्हा अभिनयात करिअर करणारा एकमेव अभिनेता म्हणजे अंगद बेदी (Angad Bedi). रविवारी (६ फेब्रुवारी) त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ या अभिनेत्याबद्दल खास गोष्टी.

अभिनेता अंगद बेदीला पहिल्या पासूनच क्रिकेटची आवड होती. कारण त्याचे वडील बिशन सिंग बेदी हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. अंगद बेदीचा जन्म ६ फेब्रुवारी १९८३ला दिल्लीमध्ये झाला. अंगदने ‘काया तरण’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र त्याला खरी लोकप्रियता ‘फालतू’ चित्रपटाने मिळवून दिली. परंतु चित्रपटात येण्यापूर्वी तो एक चांगला क्रिकेटपटू होता.

वयाच्या १६व्या वर्षापासून त्याने रणजी सामने खेळण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे, तर तो १९ वर्षाखालील क्रिकेट सामन्यात सुद्धा खेळला आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तो उजवीकडून आणि डावीकडूनही खेळू शकतो. क्रिकेटनंतर अंगदने अभिनयात नशीब आजमावून पाहिले. यशस्वी मॉडेलिंग नंतर त्याने अभिनयास सुरुवात केली. ‘पिंक’, ‘डियर जिंदगी’, ‘टायगर जिंदा है’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात त्याने काम केले. OTT प्लॅटफॉर्मवर त्याच्या ‘inside edge’ वेब सिरीजचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. आपल्या या यशाचे श्रेय तो आई वडील आणि अमिताभ बच्चन यांना देतो.

आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या या प्रतिभावान अभिनेत्याने आपले लग्न मात्र अत्यंत गुप्तता पाळत केले. अभिनेत्री नेहा धूपियासोबत (Neha Dhupia) तो दीर्घकाळ प्रेमात होता, मात्र याची कुणालाही खबर लागू दिली नाही. २०१८मध्ये दोघांनी थेट विवाह करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यातच अंगद पिता झाला. कारण लग्न ठरले तेव्हाच अभिनेत्री नेहा धूपिया गरोदर होती. अंगद फक्त क्रिकेटर, मॉडेल, अभिनेता नाही तर एक उत्कृष्ठ शेफ सुद्धा आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा