Saturday, March 2, 2024

आजही अविवाहित आहे अक्षय खन्ना, तब्बल 27 वर्षे मोठ्या राजकारणी महिलेलाही करायचे होते डेट  

अक्षय खन्नाचे (Akshaye Khanna) नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये गणले जाते. अक्षय हा बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा आहे. त्याने ‘रेस’, ‘दिल चाहता है’, ‘हंगामा’, ‘ताल’ आणि ‘हसल’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अक्षय शेवटचा ‘सेक्शन 375’ मध्ये दिसला होता. आपल्या अभिनयामुळे त्यांनी अनेक फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कारही जिंकले आहेत. अक्षय खन्ना मंगळवारी (28 मार्च) त्याचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग यानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील रंजक किस्से…

अक्षय खन्नाने ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाची निर्मिती त्यांचे वडील विनोद खन्ना यांनी केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पण त्यानंतर त्याला सर्वच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर तो ‘बॉर्डर’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटासाठी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले, तर त्याने अद्याप लग्न केलेले नाही. अक्षय खन्नाचे नाव 2-3 बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. मात्र त्याने कोणाशीही लग्न केले नाही. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबातही करिश्मा कपूरचे वडील रणधीर कपूर यांची इच्छा होती की, तिने अक्षय खन्नासोबत लग्न करावे. मात्र, नंतर करिश्माची आई बबिता यांनी या नात्याला नकार दिला.

अक्षय खन्नाचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले असेल, पण तो कधीच याबद्दल उघडपणे बोलला नाही. अक्षय खन्नाने एकदा सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये खुलासा केला होता की, त्याला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना डेट करायचे आहे. अक्षय खन्ना म्हणाला होता की, जयललिता यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्याला आकर्षित करतात. (birthday special akshaye khanna know about facts)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट, म्हणाला

‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

हे देखील वाचा