Tuesday, March 5, 2024

सुजलेला चेहरा, डोळ्यांना जखम…. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या ‘या’ अभिनेत्रीवर हल्ला

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक अनेकदा एकमेकांबरोबर वाद घालत असतात. या वादाचा परिणाम त्यांच्या खऱ्या आयुष्यावरही होतो. बिग बॉस तमिळ 7ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री वनिता विजयकुमारवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. वनिता विजयकुमारवर रविवारी रात्री चेन्नईतील एका रेस्टॉरंटमध्ये हल्ला करण्यात आला.

झालं असं की, वनिता (Vanitha Vijayakumar ) रात्री 1 वाजता जेवण करण्यासाठी बाहेर गेली होती. जेवण केल्यानंतर ती कार पार्किंगमध्ये कारमध्ये बसण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे अंधार होता. तेवढ्यात कुठूनतरी एक व्यक्ती आली आणि त्याने वनितावर हल्ला केला. हल्ल्यात वनिताला गंभीर दुखापत झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हल्ल्यात वनिता विजयकुमारच्या डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनिता विजयकुमारने हल्ल्याच्या आरोपात प्रदीप एंटनीच्या चाहत्यांवर बोट ठेवले आहे. प्रदीप एंटनी हा बिग बॉस तमिळ 7 चा विजेता आहे. वनिता विजयकुमारने प्रदीप एंटनीसोबत वाद घातला होता. या वादाचा परिणाम म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप तिने केला आहे.

 पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हल्ल्यामागे कोण आहे हे शोधत आहेत. या प्रकरणी वनिताने तिच्या ट्विटर हँडलवर चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीचा फोटो शेअर केला होता. यासोबत अभिनेत्रीने लिहिले की, “‘हा हल्ला क्रूर होता. कोणी केले हे देव जाणो.” प्रदीप अँटोनी यांच्या समर्थकाने हा हल्ला केला असल्याचा आरोप तिने पोस्टमध्ये केला आहे. (Attack on actress Vanitha Vijayakumar who exited from Bigg Boss)

आधिक वाचा-
फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 : ‘ज्युबिली’ला मिळाले सर्वाधिक पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी
शाहरुख खान आणि अनन्या पांडेवर गुन्हा दाखल? वाचा काय आहे कारण

हे देखील वाचा