Monday, April 15, 2024

अभिषेक आधी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात होती करिष्मा कपूर, अशी बांधली गेली व्यवसायिकाशी लगीनगाठ

करिश्मा कपूर 90च्या दशकात,बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती, जिचे नाव चित्रपट जगतात वापरले जात होते. कपूर घराण्याची मुलगी नक्कीच आहे पण करिश्माने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. करिश्मा केवळ सौंदर्यातच नाही, तर अभिनय आणि नृत्यातही कोणापेक्षा कमी नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एक ते एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. पण अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या शिखरावर उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून चाहत्यांची मने तोडली. करिश्मा चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असायची. संजय कपूरच्याही आधी त्याच्या आयुष्यात दोन अभिनेते आले. रविवारी(25 जून) करिष्मा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य चाहत्यांसाठी खुल्या पुस्तकासारखे आहे. पण यात अजय देवगणची (ajay devgan) कहाणी फार कमी लोकांना माहिती आहे. एक काळ असा होता की करिश्मा आणि अजय एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते हे फार लोकांना माहित नसे. दोघांनी ‘सुहाग’ आणि ‘जिगर’ सारख्या काही चित्रपटात एकत्र काम केले. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि त्यानंतर अजय आणि करिश्मा एकमेकांना डेट करू लागले. पण याच दरम्यान अजय देवगणचे नाव रवीना टंडनसोबतही (raveena tandon)जोडले जाऊ लागले. यानंतरच अजय देवगण आणि करिश्माचे नाते तुटले.

एक काळ असा होता की फिल्मी दुनियेत करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांची नावे एकत्र घेतली जात होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते आणि त्यांना लग्न करायचे होते. या दोघांची पहिली भेट 1997मध्ये अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि राज कपूर यांचा नातू निखिल नंदा यांच्या लग्नात झाली होती आणि पहिल्या भेटीतच दोघेही एकमेकांना आवडू लागले होते. त्या काळात करिश्मा बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री होती आणि अभिषेकने फिल्मी दुनियेत पाऊलही ठेवले नव्हते. मात्र, जेव्हा अभिषेकने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते, तेव्हा अचानक 2002मध्ये करिश्मा आणि अभिषेकच्या लग्नाची घोषणा झाली. या बातमीने चाहत्यांना तसेच अनेक सेलिब्रिटींना आश्चर्याचा धक्का बसला.

अमिताभ बच्चन यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची एंगेजमेंट झाली. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर पाच महिन्यांनी त्यांचे नाते तुटले. या एका बातमीने चित्रपट विश्वात पुन्हा खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीची आई बबिता यांच्यामुळे अभिषेक आणि करिश्माचे नाते तुटल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. असा दावा केला जातो की त्या काळात अभिषेकचे कोणतेही करिअर नव्हते आणि बच्चन कुटुंबाची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती. अशा परिस्थितीत आपल्या मुलीचे लग्न अभिषेकसोबत व्हावे असे बबिता यांना वाटत नव्हते. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, करिश्माने लग्नानंतर फिल्मी दुनियेत काम करावे असे जया बच्चन यांना वाटत नव्हते. दोन्ही आईमुळेच करिश्मा आणि अभिषेकचे नाते तुटल्याचा दावा केला जात आहे.

यानंतर उद्योगपती संजय कपूरने करिश्मा कपूरच्या आयुष्यात प्रवेश केला आणि 29 सप्टेंबर 2003 रोजी दोघांनी लग्न केले. संजय कपूर शीख धर्माचा असल्याने दोघांनीही पारंपारिक शीख रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. करिश्मा कपूर आणि संजय कपूर त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते. लग्नानंतर दोघेही अदारा आणि कियान या दोन मुलांचे पालक झाले. मात्र, करिश्माचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. करिश्मा कपूरने पती संजय कपूरवर अनेक गंभीर आरोप करत घटस्फोट घेतला होता आणि आजच्या काळात अभिनेत्री आपल्या दोन्ही मुलांसोबत आयुष्य जगत आहे.(birthday special karisma kapoor love life affair with ajay devgn and abhishek bachchan)

अधिक वाचा-
गरोदर सना खानची ‘अशी’ झालीये अवस्था, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

‘मिस यू..,’ म्हणत मुग्धा वैशंपायनने काढली प्रथमेश लघाटेची आठवण; म्हणाली…

हे देखील वाचा