खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?


सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती अचानक प्रकाशझोतात आली. बऱ्यापैकी ओळख असणाऱ्या रियाला सुशांतच्या आत्महत्येनंतर मुख्य आरोपी म्हणून आणि ड्रग्ज केसमध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास ३० दिवसांनी तिची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. या सर्व घटनांमध्ये रिया काही महिने सोशल मीडियापासून दूर होती. परंतु, आता हळूहळू रिया सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय होऊ लागली आहे. ती तिचे आयुष्य देखील सामान्य जगण्याचा प्रयत्न करत असून, चित्रपटांमध्ये पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहे. नुकतेच तिचे नाव बिग बॉस १५ साठी खूपच चर्चेत आले होते. पण, काही रिपोर्टनुसार या फक्त अफवा निघाल्या. सध्या रिया तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र माहितीनुसार तिने कोणताही सिनेमा साइन केला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार रियाला काही आंतरराष्ट्रीय कास्टिंग एजेन्सी साइन करण्याच्या तयारीत आहे. तीन आंतरराष्ट्रीय कास्टिंग कंपन्यांनी रियासोबत काही नव्या प्रोजेक्टसाठी चर्चा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, रियाकडून या कंपन्यांना अजून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नाहीये. सुशांत सिंगच्या मृत्यचे कव्हरेज फक्त भारतीय मीडियाने नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मीडियाने देखील खूपच मोठे कव्हरेज केले होते. सोशल मीडियावर देखील रिया मोठ्या प्रमाणावर लाइमलाईट्मधे होती. यामुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. म्हणूनच तिला इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या ऑफर येत आहे. मात्र या सर्वांमध्ये महत्वाचे आहे, की रिया बॉलिवूडमध्ये कमबॅक कसे करते आणि तिला प्रेक्षक कसे स्वीकारतील. (Rhea Chakraborty will get a chance in Hollywood)

सुशांत सिंग मृत्यू प्रकरण आणि ड्रग्ज केसमध्ये अडकल्यानंतर रिया अचानक गायब झाली होती. ती फक्त या केससंदर्भातच समोर आली. मात्र आता ती सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे. तिचा एक साधा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यासोबतच तिने सुशांतला जाऊन एक वर्ष झाल्यावरही एक पोस्ट शेअर केली होती. कधीकधी ती पॅपराजींच्या कॅमेरातही कैद होताना दिसते.

रिया लवकरच अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्यासोबत ‘चेहरे’ चित्रपटात झळकणार आहे. ‘चेहरे’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रियाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे रिया चित्रपटात आहे की नाही याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रियाची एक झलक पाहायला मिळाली. ‘चेहरे’ एप्रिलमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु, करोनामुळे ‘चेहरे’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.