मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही भलेही बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची तगडी फॅन फॉलोविंग तयार झाली आहे. तिच्या चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी ती सोडत नाही. ती नेहमीच तिच्या प्रेक्षकांसाठी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंसोबत अनेकवेळा आपल्याला तिचा फिटनेस देखील पाहायला मिळतो. नुकताच तिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मीराला पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत. मोठेमोठे ओठ असलेला मिराचा हा लूक प्रेक्षकांना अजिबात आवडला नाहीये. 

मीरा राजपूत ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री नाक आणि ओठाची सर्जरी करत असतात. मीरा राजपूतचा हा लूक पाहून असे वाटत आहे की, तिने ओठांची सर्जरी केली आहे. त्यामुळे तिच्या ओठांचे हे हाल झाले आहेत.

परंतु नंतर हे समजते की, हे खरं नाहीये ते तिने केवळ मस्तीमध्ये केले आहे. तिने तसा फिल्टर वापरला आहे. त्यामुळे तिचे ओठ असे दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी माझ्या ओठांना केवळ लायनिंग केले आहे बाकी काहीच नाहीये.” या व्हिडिओमध्ये ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी मैं आये’ हे गाणे बॅकग्राउंडला लावले आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ पाहून काहीजण हैराण झाले आहेत तर काही हसून हसून लोटपोट होत आहेत. (Meera Rajput tries new look on Instagram, see her latest look with swollen lips)

मीरा नेहमी सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासोबतचे तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिचे हे फोटो तिच्या आणि शाहिद कपूरच्या चाहत्यांना खूप आवडत असतात. शाहिद आणि मीराने २०१५ साली लग्न केले आहे. त्यानंतर २०१६ साली त्यांना मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी मिशा असे ठेवले आहे. तसेच २०१८ मध्ये त्यांना जैन नावाचा मुलगा झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश

-सूर्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले खास गिफ्ट; शेअर केला ‘जय भीम’ सिनेमाचा फर्स्ट लूक

-‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख


Leave A Reply

Your email address will not be published.