Friday, April 19, 2024

जॅकलीनला दिल्ली पोलिसांकडून समन्स; 14 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात यापूर्वी जारी केलेल्या समन्सनुसार अभिनेत्रीला १२ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

पण काही कारणांमुळे जॅकलीन आज न्यायालयात जाऊ शकली नाही. त्यामुळे तिला आता 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी दिलं आहे. कही दिवसापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची सोमवारी होणारी चौकशी पुढे ढकलली होती. तसेच या संदर्भात जॅकलिनला आणखी एक समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. खरं तर, अभिनेत्रीने दिल्ली पोलिसांना ईमेलद्वारे कळवले होते की आधीच केलेल्या काही वचनबद्धतेमुळे ती 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या तपासात उपस्थित राहू शकणार नाही, त्यानंतर तिने नवीन तारखेची मागणीही केली होती.

सुकेश चंद्रशेखर यांच्या कथित 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तपासात सामील होण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या चार्जशीटमध्ये जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात ठेवले होते. जॅकलिनला सुकेशचा गुन्हेगारी खटल्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती होती, असेही ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतरही त्याने सुकेशच्या गुन्हेगारी नोंदीकडे दुर्लक्ष करून आर्थिक व्यवहार केले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचे नाव समोर आल्यापासून अभिनेत्री अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीची 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर 2021 रोजी चौकशीही करण्यात आली होती. यादरम्यान अभिनेत्रीने चंद्रशेखरकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. सुकेश चंद्रशेखर हा मूळचा बेंगळुरू, कर्नाटकचा रहिवासी असून तो सध्या दिल्लीच्या तुरुंगात बंद असून त्याच्यावर १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. चंद्रशेखरवर रोहिणी कारागृहात असताना 200 कोटींच्या खंडणीचा आरोप होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमारच्या नव्या जाहिरातीवर संतापले नेटकरी, जाणून घ्या कारण

शानदार, जोरदार, जबरदस्त! ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा टीझर रिलीज
‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर हिट, पण आलिया भट्टला का मागावी लागली मीडियाची माफी? व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

हे देखील वाचा