Sunday, April 14, 2024

‘या’ कारणामुळे मोडला 5 वर्षांचा सुखीसंसार, रश्मी देसाईच्या घटस्फोटामागचं खरं कारण आलं पुढे

बॉलीवूडमधील लग्न ही फार काळ टिकत नाहीत हा इतिहास आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्याला देता येतील. नव्हे दैनिक बोंबाबोंबने दिलीच आहेत. यावर एक विस्तृत लेख वेबसाईटवर उपलब्ध आहे तो आपण जरूर वाचावा.

बॉलीवूडच काय उलट मालिकविश्वात देखील असंच होतं बऱ्याचदा! मालिकेच्या सेटवर भेट होते, मग एकत्र काम करता करता ओळख वाढते, त्याचं रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेम! ही प्रोसेस इतकी सुपर फास्ट असते की मालिकेचे शंभर भाग यासाठी पुरेसे ठरतात. मग मालिका संपण्याची वाट पाहिली जाते. मालिका संपल्यानंतर मग लग्न केलं जातं. नव्याने नऊ दिवस गेले की मग वाद विवाद होऊ लागतात. पुढील वर्षभरात किंवा फार फार तर दोन वर्षांमध्ये घटस्फोट होतो. हीच रीत आजकालच्या या सेलिब्रिटींची झाली आहे.

हे इतकं सगळं सांगितलं कारण की मालिका क्षेत्रातील अशी अनेक उदाहरणे आहेत परंतु आज आपण फक्त एकच उदाहरण पाहणार आहोत ते म्हणजे मालिका क्षेत्रातील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या जोडप्यांपैकी एक असलेल्या जोडप्याबद्दल म्हणजे नंदिश संधू आणि रश्मी देसाईबद्दल! आपण म्हणाल का? तर आज आपल्या नंदिश भाऊंचा वाढदिवस आहे, त्यामुळे जरा त्यांच्या या आठवणींवर नजर टाकाऊयात म्हटलं.

राजस्थानच्या मातीत जन्माला आलेल्या नंदिशने आधी मॉडेलिंगक्षेत्रात स्वतःचं नाव कमावलं आणि मग तो मालिका क्षेत्राकडे वळाला. २००७ मध्ये मालिका कस्तुरीमधून त्याने मालिकक्षेत्रात पदार्पण केलं. परंतु त्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे कलर्स वाहिनीवरील मालिका उतरनमुळे! उतरन मालिकेमधील वीर सिंह हे त्याची भूमिका खूपच गाजली. आणि हीच मालिका करताना मालिकेच्या सेटवर मालिकेत खलनायकी भूमिका साकारणारी रश्मी देसाई हिच्या सोबत ओळख झाली. ओळख इतकी घट्ट झाली की तिची मैत्री झाली, मैत्रीचं प्रेम आणि मग गोष्ट लग्नापर्यंत जाऊन पोहोचली. मालिका सुरू असतानाच दोघांनी लग्न देखील केलं परंतु पुढील काही दिवसांमध्येच हे लव्हबर्डस वेगळे झाले होते. नेमकं असं काय झालं होतं पाहुयात!

नंदिश संधू आणि रश्मी देसाई यांची पहिली भेट ‘उतरन’ मालिकेच्याच्या सेटवर झाली होती. या मालिकेत दोघेही मुख्य भूमिकेत होते. सेटवर दोघांची जवळीक वाढली आणि मग दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. २०१२ मध्ये त्यांनी त्यांचं नातं एक लेव्हल पुढे नेलं आणि मग त्यांचं लग्न झालं. नंदीश संधू आणि रश्मी देसाई यांचं लग्न फक्त चारच वर्षे टिकलं. रश्मीने दावा केला होता की त्यांचं लग्न मोडण्यामागे नंदिशच्या खूप साऱ्या मैत्रिणी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर नंदिशचं म्हणणं याउलट असं आहे की रश्मीच्या अति संवेदनशील वागण्याने तो नाराज आहे.

माध्यमांनुसार, रश्मी देसाईने गर्भपात केलं होतं ज्यामुळे मानसिकरित्या ती त्रासात होती आणि या त्रासातूनच मग दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे नंदिश संधू सोबत मिस इंडिया ठरलेली अंकिता शौरीचं नाव जोडलं जात होतं. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पुढे एकदा रश्मी म्हणाली होती की, नंदिशने आमचं नातं टिकवायला जर १०० टक्के प्रयत्न केले असते तर आज परिस्थिती काहीशी वेगळी असती. सगळं काही व्यवस्थित सुरू राहिलं असतं.

सध्या नंदिश हा मालिका क्षेत्रापासून चार हात लांब आहे कारण त्याला बॉलिवूडमध्ये नशीब आजमवायचं आहे. पाहायला गेलं तर नंदिशची त्यादिशेने सुरुवातही केली आहे. त्याने मागील वर्षी आलेल्या सुपर३० या चित्रपटात हृतिक रोशनच्या सख्ख्या भावाची भूमिका साकारली होती. प्रख्यात प्राध्यापक आनंद कुमार यांच्यावर बनवला गेलेला जीवनपट सुपर30 हा बॉक्सऑफिसवर तुफान चालला होता. दुसरीकडे रश्मी देसाई ही अजूनही मालिका विश्वातच काम करत आहे सोबत ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच झळकणार असल्याच्या चर्चा मात्र बी-टाऊनमध्ये सुरू आहेत.(birthday special of nandish  singh sandhu and rashami desai divorce reason)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

हे देखील वाचा