तीन वर्षांच्या वयात हरवले वडिलांचे छत्र; ११ वी नंतर पारसने केली मॉडेलिंगला सुरुवात; ‘या’ अभिनेत्रींशी जोडलंय नाव


अनेक कलाकार असे असतात, ज्यांना मालिकांपेक्षा जास्त लोकप्रियता ही रियॅलिटी शोमधून मिळते. तसेच काही कलाकार मालिका न करता फक्त रियॅलिटी शो करतात आणि अमाप लोकप्रियता मिळवतात. असाच एक अभिनेता म्हणजे पारस छाबडा. ‘बिग बॉस’ फेम पारस छाबडाने रियॅलिटी शोमधून या ग्लॅमर जगात प्रवेश केला आणि प्रसिद्धी मिळवली. रविवारी (११ जुलै) पारस त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमितायने त्याच्याबद्दल खास गोष्टी जाणून घेऊया. चला तर मग वाट कशाची पाहताय सुरुवात करूया…

पारसचा जन्म ११ जुलै, १९९० ला दिल्लीमध्ये एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. त्याचे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीमध्येच झाले. पारस तीन वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याचे सर्व पालनपोषण आईनेच केले. पुढे ११ वी नंतर पारसने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. या दरम्यानच त्याला एका फोटोशूटची ऑफर देखील मिळाली.

पारसने स्प्लिट्सविला 5 शोमधून त्याच्या टीव्ही करियरला सुरुवात केली. या शो च्या 5 व्या पर्वाचा तो विजेता देखील राहिला. या शोनंतर त्याला अनेक वेगवेगळ्या शोच्या ऑफर्स मिळायला सुरुवात झाली. या शोनंतर तो सारा खानसोबत व्ही चॅनेलवरच्या व्ही द सीरियलमध्ये दिसला. २०१५ साली पुन्हा त्याने स्प्लिट्सव्हिलाच्या आठव्या पर्वात स्पर्धक म्हणून एन्ट्री केली. पुढे त्याने एँड टीव्हीवरील ‘बढो बहू’, स्टार प्लसवरील ‘आरंभ’ मालिकांमध्ये काम केले. सोबतच तो ‘कलीरे’, ‘कर्ण संगिनी’, ‘विघ्नकर्ता गणेश’, ‘अघोरी’ आदी मालिकांमध्ये झळकला. ‘विघ्नकर्ता गणेश’मध्ये त्याची रावणाची भूमिका खूप गाजली.

यासोबतच पारस हिंदी चित्रपटातही दिसला आहे. ‘एम 3 मिडसमर मिडनाइट मुंबई’मध्ये पारसने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन ब्रिजभूषण यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा खान, किरण कुमार, मिलिंद आदी महत्वाच्या भूमिकांमध्ये होते.

आता कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा होणार नाही, असे कलाकार शोधूनही सापडणार नाही काही अपवाद वगळे तर. तसेच पारसच्या बाबतीतही असे झाले आहे. त्याचे नावसुद्धा अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले.

यात त्याचे नाव पहिले जोडले गेले ते म्हणजे सारा खान. सारा आणि पारसने दोन प्रोजेक्टमध्ये सोबत काम केले होते. मात्र, एका वळणावर त्यांचे हे नाते पारसमुळे तुटले. तो साराला वेळ कमी देऊ लागला आणि त्याचे वागणे देखील बदलले होते. म्हणून त्यांनी ब्रेकअप केले.

त्याचे दुसरे नाव जोडण्यात आले पवित्रा पुनियासोबत. ‘बिग बॉस’ ची स्पर्धक असलेल्या पवित्रासोबत पारस नात्यात होता. मात्र, ती आधीपासूनच विवाहित असल्याचे तिने लपवले होते. त्यामुळे हे नाते तुटले.

‘बिग बॉस’मध्ये येण्याआधी तो अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत नात्यात होता. त्यांनी एकमेकांच्या नावाचे टॅटू देखील काढले होते. मात्र, काही काळाने हे कपल देखील वेगळे झाले.

‘बिग बॉस’च्या घरात शहनाज गिलने सांगितले होते की, तिला पारस आवडतो. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होऊ लागल्या. मात्र, यांच्यात पुढे काहीच घडले नाही.

पारस आणि माहिरा शर्माने नेहमीच ते चांगले मित्र असल्याचे सांगितले. या दोघांनी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात सर्वात जास्त लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवणारा स्पर्धक म्हणून आजही पारसचे नाव घेतले जाते. भलेही तो हा शो जिंकण्यात यशस्वी झाला नाही. तरी तो खूप प्रसिद्ध झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नीतू कपूर सूनेला ठेवतील एखाद्या ‘राणीप्रमाणे’; रिद्धिमा कपूरने सांगितले कसे असेल सासू-सूनेचे नाते

-ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा

-चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’; पाहिजे तितकी वाट बघायला निर्मात्यांची तयारी


Leave A Reply

Your email address will not be published.