ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा


आजच्या डिजिटल युगात सर्वकाही डिजिटल झालं आहे. अशामध्ये सर्वजण सोशल मीडियावर आपला वेळ घालवणे पसंत करतात. अभिनय क्षेत्रातील कलाकारही याला अपवाद नाहीत. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी त्यांच्यासाठी तर हे प्लॅटफॉर्म खूप महत्वाचं आहे. कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ दरदिवशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. चाहतेही या फोटोला भरभरून प्रेम देताना दिसतात. अशाच एका कलाकाराचा एक फोटो समोर आलाय. तो पाहून त्या कलाकाराला ओळखणेही कठिण जातंय.

हा फोटो राजश्री मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. काही युजर्सना त्याची ओळख अद्याप पटली नाही. मात्र काही चाहत्यांनी त्याला त्याच्या डोळ्यांवरून ओळखल्याचे दिसून येत आहे.

तर हा फोटो आहे, ‘सैराट’ फेम आकाश ठोसरचा. होय, हा तुमचा आमचा लाडका परशा आहे. त्याचा हा फोटो चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शिवाय आकाश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सतत पोस्ट शेअर करत तो चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतो.

आकाश ठोसरबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटात अभिनय करून, प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या चित्रपटाने त्याला एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहचवले. यानंतर तो ‘एफ यु’, ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये दिसला. आता आकाश महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘झुंड’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नऊ वर्षांपूर्वी विकी कौशलने दिले होते त्याचे पहिले ऑडिशन; आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते गणना

-आजीच्या निधनाने पुरती तुटली आहे अनन्या पांडे; महिला दिनानिमित्त शेअर केली होती आजीसोबतची शेवटची पोस्ट

-जोर धरू लागलीय फरहान अख्तरनच्या ‘तूफान’ला बॉयकाट करण्याची मागणी; ट्विटरवर ट्रेंड होतोय #boycotttoofaan


Leave A Reply

Your email address will not be published.