बॉलिवूड चित्रपट सुपरहिट होण्यासाठी जशी एका चांगल्या स्टोरीची गरज असते, त्याचप्रमाणे चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट होण्यासाठी गायकांची गरज असते. अनेकवेळा प्रेक्षक केवळ गाण्यांसाठी चित्रपट बघण्यासाठी जात असतात. गाणी हिट होण्यासाठी गायकांना अनन्यसाधारण महत्त्व असते. असाच एक बॉलिवूडमधील सुपरहिट गायक, ज्याने वयाच्या केवळ 27 व्या वर्षी संगीत क्षेत्रात त्याचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. तो गायक म्हणजे अरमान मलिक. शुक्रवारी (22 जुलै) अरमान त्याचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे.
अरमानचा जन्म 22 जुलै, 1995 मध्ये झाला आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक हे त्याचे वडील आहेत. ज्योती मलिक या आई आहेत, तर गीतकार अमाल मलिक हा त्याचा भाऊ आहे. अन्नू मलिक हे त्याचे काका आहेत, तर त्याचे आजोबा हे इंडस्ट्रीमधील अनुभवी दिग्दर्शक होते. एकंदरित त्याचे संपूर्ण कुटुंब संगीताच्या सुरात एकरूप झालेले आहे. चला तर आज त्याच्या टॉप ५ गाण्यांबाबत जाणून घेऊया. (Birthday special: singer Armaan Malik also known as prince of romance)
एवढ्या कमी वयात प्रसिद्धी मिळवलेल्या अरमानला आज सर्वत्र ‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ असे म्हटले जाते. ‘मैं रहू या ना रहू’ हे अरमान मलिकच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याचे चित्रीकरण इमरान हाश्मी आणि ईशा गुप्ता यांच्यावर केले होते.
त्याचे ‘हिरो’ या चित्रपटातील ‘मैं हू हिरो तेरा’ हे गाणे देखील खूप गाजले होते. या गाण्याचे चित्रीकरण सूरज पांचोली आणि आथिया शेट्टी यांच्यावर केले होते.
‘हेट स्टोरी 3’ मधील ‘तुझे अपना बनाने का’ या गाण्यात अरमान मलिकसोबत निती मोहन होती. अत्यंत रोमँटिक अंदाजात गायलेले हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.
‘वजह तुम हो’ हे ‘हेट स्टोरी 3’ मधील सर्वात चर्चेत असणारे गाणे होते. 2015 सालाचे हे एक ट्रेंड गाणे होते. मनोज मुंतशिर यांनी हे गाणे लिहिले होते, तर झरीन खान आणि करण सिंग ग्रोवर यांच्यावर या गाण्याचे चित्रीकरण केले होते.
‘जय हो’ या चित्रपटातील ‘तुम को तो आना ही था’ या गाण्याला देखील अरमान मलिकने आवाज दिला होता. तसेच या गाण्याचे चित्रीकरण सुपरस्टार सलमान खान आणि डेझी शाह यांच्यावर केले होते.
अरमान मलिकने हिंदीसोबत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अरमानने इंग्लिश, तमिळ, तेलुगू, बंगाली, पंजाबी, गुजराती, मराठी, मल्याळम या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तो आता भारतीय संगीत क्षेत्रातील एक टॉपचा गायक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऑगस्टमध्ये बॉक्स ऑफिसवर राडा होणार फिक्स! रक्षाबंधन ते लायगर, रिलीजसाठी ‘हे’ सिनेमे सज्ज
‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’ म्हणीला फाट्यावर मारणारे साजिद-वाजिद, ज्यांनी सलमानलाही बनवले सुपरस्टार