Wednesday, June 26, 2024

सलमानने मारलेल्या काळवीटाचे उभारणार भव्यदिव्य स्मारक, बिश्नोई समाजाची घोषणा

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने माध्यमांमध्ये चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खानला जिवे मारण्याची धमकी आली होती. तेव्हापासून भाईजानच्या सुरक्षिततेची मोठी काळजी घेण्यात येत होती. इतकेच नव्हेतर सलमान खानने मुंबई पोलिसांकडून  शस्त्र बाळगण्याचीही परवानगी मिळवली होती. परंतु आता पुन्हा एकदा सलमान खानच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे सलमान खानने मारलेल्या काळवीटाचे स्मारक बांधण्याचा निर्णय बिश्नोई समाजाने घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती सलमान खानच्या काळवीट हत्या प्रकरणाची. अभिनेता सलमान खानने २००७ मध्ये हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खानने काळ्या काळवीटाची शिकार केली होती. या प्रकरणाने सलमान खान चांगलाच अडचणीत आला होता. आजही या प्रकरणामुळे सलमान खान अनेकदा चर्चेत येत असतो. सध्या अशीच चर्चा या प्रकरणाची होताना दिसत आहे.

बिश्नोई समाजाने सलमान खानने मारलेल्या काळवीटाचे भव्यदिव्य स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, ज्या ठिकाणी हरणाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी कांकणी गावात स्मारकासह एक मोठे प्राणी बचाव केंद्र बांधले जाणार आहे. सात बिघा जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक 3 फुटांचे असेल, ज्याचे वजन 800 किलो असेल. यासोबतच एक रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार असून तेथे प्राणी आणि पक्ष्यांवर उपचार केले जाणार आहेत.

काकाणी गावातील मंदिरात ही काळ्या हरणाची मूर्ती बसवण्याची तयारी आहे. गावातील लोकांनी देणगी जमा करून हे मंदिर बांधले आहे. गावातील रहिवासी हनुमान राम विश्नोई यांनी सांगितले की, जेव्हा सलमान खानने येथे हरणांना मारले तेव्हा लोक प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी मंदिर बांधण्याची मागणी करत होते जेणेकरून लोक प्राण्यांचे संरक्षण करायला शिकतील. जनावरांना वाचवायचे आहे, हे लक्षात राहावे म्हणून हे मंदिर येणाऱ्या पिढीसाठी बांधले आहे, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला जामीन मंजूर केला होता. ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन काळवीट मारल्याप्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. त्यावेळी नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रेही सलमानसोबत शिकारीसाठी गेल्या होत्या. तेव्हापासून बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

हेही वाचा –
आठवडाभराच्या जीवन-मरणाच्या लढाईनंतर अ‍ॅनी हेचे यांचे निधन, प्रियांका चोप्राने वाहिली श्रद्धांजली
संजय दत्तची एक्स पत्नी ‘या’ व्यक्तीसोबत होती रिलेशनशिपमध्ये; ब्रेकअपचे धक्कादायक कारण समोर
अरबाज आणि मलायकाच्या घटस्पोटावर अशी होती सलीम खान यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी माझ्या…’

 

हे देखील वाचा