Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड कंगना रणौतची राजकारणात ग्रँड एंट्री, ‘या’ भागातून मिळाले लोकसभा निवडणुकीचे तिकीट

कंगना रणौतची राजकारणात ग्रँड एंट्री, ‘या’ भागातून मिळाले लोकसभा निवडणुकीचे तिकीट

भाजपने 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. त्याचवेळी, अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिची राजकीय इनिंग सुरू करत असल्याचे या यादीतून स्पष्ट झाले आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तसेच अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

कंगना रणौतने काल वाढदिवसानिमित्त भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केल्यानंतर अभिनेत्रीच्या आनंदाला सीमा नाही. भाजपप्रती कृतज्ञता व्यक्त करत कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे, तिने लिहिले आहे की, “आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझी जन्मभूमी हिमाचल प्रदेश, मंडी (मतदारसंघ) येथून मला लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे, मी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचे पालन करते. अधिकृतपणे पक्षात सामील होण्यासाठी मी सन्मानित आणि उत्साहित आहे. मी एक सक्षम कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक बनण्याची आशा करते. धन्यवाद!”

भाजप उमेदवारांची पाचवी यादी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी, कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बगलामुखी मंदिरात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. यावेळी पत्रकारांनी तिला लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले होते, ज्यावर अभिनेत्री म्हणाली होती की, जर आईची इच्छा असेल तर ती नक्कीच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल.

रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. सध्या राजेंद्र अग्रवाल येथून खासदार आहेत. अरुणबद्दल सांगायचे तर, तो ‘रामायण’ नंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप सक्रिय आहे आणि त्याने इतर अनेक पौराणिक मालिकांमध्येही काम केले आहे. यामध्ये ‘लव-कुश’, ‘विश्वामित्र’ आणि ‘बुद्ध’ या टीव्ही शोमधील राजा हरिश्चंद्राच्या पात्राचा समावेश आहे. टीव्हीवरील त्यांचे दुसरे लोकप्रिय पात्र म्हणजे ‘विक्रम बेताल’मधील राजा विक्रम.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेत्री नेहा शर्मा लढवणार आगामी लोकसभा निवडणूक? वडील अजित शर्मा यांनी केला मोठा खुलासा
राणी मुखर्जीला आठवले ‘गुलाम’ चित्रपटाचे डबिंग; म्हणाली, ‘आमिरला तो चित्रपट…’

हे देखील वाचा