Tuesday, April 23, 2024

अभिनेत्री नेहा शर्मा लढवणार आगामी लोकसभा निवडणूक? वडील अजित शर्मा यांनी केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश करू शकते. बिहारमधील भागलपूरमधील काँग्रेस आमदार अजित शर्मा यांनी मुलगी नेहाच्या राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले आहेत. नेहा आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याबद्दल अजित शर्मा उघडपणे बोलले. यावर नेहाची प्रतिक्रिया काय होती याचाही खुलासा केला.

काँग्रेसचे आमदार अजित शर्मा यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नेहाने आगामी लोकसभा निवडणूक लढवावी अशी त्यांची आणि काँग्रेस पक्षाची इच्छा आहे. ते म्हणाले की, “मी नेहाशी याबद्दल बोललो होतो, पण ती विविध कार्यक्रम आणि शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. ती मला म्हणाली, पापा, मी यावेळी निवडणूक लढवू शकत नाही. तुम्ही किंवा पक्षाने मला पाच-सहा महिन्यांपूर्वी सांगितले असते तर मी नक्कीच निवडणूक लढवली असती.”

अजित शर्मा पुढे म्हणाले, “नेहाने पुढच्या वेळी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे’. या दरम्यान, काँग्रेस आमदाराने ‘कुटुंबवाद’ किंवा घराणेशाहीचे राजकारण असल्याचा कोणताही दावा फेटाळून लावला. नेहा शर्माने 2010 मध्ये इमरान हाश्मीसोबत ‘क्रुक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून नेहा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसली आहे. यामध्ये 2013 मध्ये रिलीज झालेला ‘यमला पगला दीवाना 2’ आणि 2020 मध्ये रिलीज झालेला अजय देवगण स्टारर ‘तानाजी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. नेहा सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे, तिचे एकट्या इंस्टाग्रामवर 21 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

इम्रानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट, साऊथचा डेब्यू चित्रपट ‘ओजी’चा फर्स्ट लूक रिलीज
आतिफ असलमच्या लेकीला पाहिले का? दिसतीये अगदी प्रिन्सेस

हे देखील वाचा