Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड करिष्मा कपूरने केला करिअरमधील चढ-उतारांचा खुलासा; म्हणाली, ‘आमच्या वेळी पीआर टीम…’

करिष्मा कपूरने केला करिअरमधील चढ-उतारांचा खुलासा; म्हणाली, ‘आमच्या वेळी पीआर टीम…’

अभिनेत्री करिष्मा कपूर (Karishma Kapoor) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. सध्या ती तिच्या आगामी ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सारा अली खान आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांसोबत दिसणार आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या करिअरमधील चढ-उतार आणि ‘मर्डर मुबारक’बद्दल माध्यमांशी बोलताना दिसली.

करिश्मा कपूर ‘मर्डर मुबारक’मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. हा चित्रपट होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘मर्डर मुबारक’च्या प्रमोशनदरम्यान, जेव्हा तिला विचारण्यात आले की आजकाल तुम्हाला बॉलिवूडमध्ये कोणते बदल जाणवत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात करिश्मा म्हणते, “खरं सांगायचं तर आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. त्यावेळी आम्ही आमच्या मनाप्रमाणे करायचो आणि योग्य वाटेल तो चित्रपट करायचो. काहीही हिशोब केला नाही.”

करिश्मा कपूर आपले बोलणे चालू ठेवते आणि म्हणते, “आमच्याकडे त्यावेळी पीआर टीम आणि स्टायलिश लोक नव्हते. आम्ही स्वतः सर्वकाही स्वतः करायचो. आम्ही सेटवर जाऊन शूटिंग सुरू करायचो. हा चित्रपट योग्य नाही किंवा करायचा की नाही हे आम्हाला सल्ला देणारे कोणीही नव्हते किंवा समजावून सांगणारेही कोणी नव्हते. मला फक्त काम करण्याची आवड होती म्हणून मी काम करत राहिले होते.”

तिच्या चित्रपटांबद्दल बोलताना करिश्मा कपूर म्हणते, “मी कधीही चित्रपट किंवा गाणे या विचाराने केले नाही की ते माझे करियर बदलेल किंवा फायदेशीर ठरेल, परंतु मी मागे वळून पाहिले तर मला वाटते की ‘हीरो’ नं. 1 या चित्रपटानंतर माझ्यासाठी सर्व काही बदलले आहे. त्या चित्रपटाचे यश माझ्या करिअरसाठी वरदान ठरले. या चित्रपटानंतर ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘दिल तो पागल है’ हे चित्रपट माझ्याकडे आले.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नवीन टिझर प्रदर्शित
मुंबई मेट्रोमध्ये डान्स केल्याने नोरा फतेही ट्रोल: लोक म्हणाले, ‘स्वस्त नौटंकी…’

हे देखील वाचा