बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांची मैत्री जगजाहिर आहे. करीनाने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, अमृता अरोरा तिच्या किती जवळ आहे आणि त्यांची मैत्री किती जुनी आहे. मंगळवारी (दि. 31 जानेवारी)ला अमृता अरोराचा 45 वा वाढदिवस होता. अशात करीनाने पुन्हा एकदा तिच्या बेस्ट फ्रेंडच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या घरी आयोजित केली होती.
या पार्टीत अमृताची मोठी बहीण मलायका अरोरा, तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, करिश्मा कपूरसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली. पण पार्टी संपल्यावर बर्थडे गर्ल अमृता अरोरा ज्याप्रकारे पार्टी बाहेर पडली त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमृताचा एक व्हिडिओ माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे तिला ट्रोल देखील केले जात आहे.
अमृता अरोरा या पार्टीतून अभिनेता फरहान अख्तरसोबत बाहेर पडली. यावेळी अमृता फरहानच्या जॅकेटमध्ये तिचा चेहरा लपवून मीडियाच्या कॅमेऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न करत थेट कारपर्यंत पोहोचली. म्हणजेच पार्टी सोडल्यानंतर अमृताचा चेहरा फाेटाेंमध्ये दिसत नाही. अमृता अरोराचा पती शकील लडक देखील अमृता आणि फरहानच्या मागे दिसत आहे. हे सर्व करताना फरहान हसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडिओवर प्रचंड कमेंट येत असून अमृता अरोराला माेठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘पार्टीमध्ये एवढा नशा कशाला करता की तुम्हाला चेहरा लपवावा लागतो.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे लोक असे काम का करतात माहीत नाही की, तोंड लपवावे लागते.’
अमृता अराेरा हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलयचे झाले, तर तिने ‘ओम शांती ओम’, ‘एक और एक ग्यारह’, ‘आावरा पागल दिवाना’, ‘कितने दूर कितने पास’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.(bollywood acctress kareena kapoor bday bash for amrita arora actress left party with farhan akhtar hiding face netizens trolled brutally)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
Union Budget 2023| अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अर्थसंकल्पावर आरोह वेलणकरने शेअर केलं ट्वीट; म्हणाला…
अथिया अन केएल राहुलने केले पायजमा आणि बाथरोबमध्ये फोटोशूट; लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले मॅगझिन कव्हरवर