Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड करीना कपूर खास मित्रांसोबत लुटतेय ख्रिसमसचा आनंद, पाहा फाेटाे

करीना कपूर खास मित्रांसोबत लुटतेय ख्रिसमसचा आनंद, पाहा फाेटाे

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये तिच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा हंसल मेहताच्या मर्डर मिस्ट्रीवर आहे. शूटिंगमधून वेळ काढत, करीना तिच्या खास मित्रांसोबत पार्टीचा आनंदही घेत आहे. नुकताच करीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मिकी कॉन्ट्रॅक्टर आणि नैनासोबत पार्टी मूडमध्ये दिसत आहे.

करीना लंडनमध्ये घेतेय शूटिंगचा आनंद
अभिनेत्री करीना (kareena kapoor) हिने गेल्या महिन्यात लंडनमध्ये शूटिंग सुरू केले होते. तेव्हापासून ती लंडनमध्ये शूटिंगसोबतच एन्जॉयही करत आहे. काही दिवसांपूर्वी ती बहीण आणि अभिनेत्री करीश्मा कपूर (karishma kapoor) हिच्यासोबत लंडनच्या रस्त्यावर मस्ती करताना दिसली होती. करीनाने तिच्या पोस्टद्वारे सांगितले आहे की, तिला लंडन आवडते आणि आजकाल ती तिच्या शूटचा खूप आनंद घेत आहे.

 kareena - kapoor
photo courtesy instagramkareenakapoorkhan

लाल रंगाच्या स्वेटरमध्ये करीनाने वेधले चाहत्यांचे लक्ष
करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मिकी आणि नैनासोबत दिसत आहे. मिकी आणि नैना हे दोघेही तिचे खास मित्र आहेत आणि शूटिंगदरम्यान ती अनेकदा दोघांसोबत वेळ घालवते. या फोटोसोबत हार्ट इमोजी शेअर करत करीनाने लिहिले, ‘माझ्या माणसांसोबत.’ या प्रोजेक्टमध्ये मिकी आणि नैना दोघेही करीनाच्या सोबत दिसणार आहेत. लाल रंगाच्या स्वेटरमध्ये करीना खूपच छान दिसत आहे.

kareena - kapoorकरीना कपूरने याआधीही लंडन शूटदरम्यानचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या ख्रिसमसचे वातावरण आहे आणि करीनाला ते आवडते. या चित्रपटानंतर करीना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये रिया कपूरच्या ‘द क्रू’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेननही दिसणार आहेत.(bollywood actress kareena kapoor shares photo of a party from london shooting)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बेक्रिंग! कस्टम ड्युटी न दिल्याने शाहरुख खानला विमान तळावरच गाठले पोलिसांनी

‘उर्फी जावेद तु ना फॅशनचा खून केलास…’; म्हणत नेटऱ्यांनी नवीन व्हिडिओवर व्यक्त केला संताप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा