Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

आमिरची लाडकी आयरा महागडी कार सोडून ऑटोमधून दिसली प्रवास करताना, व्हिडिओ व्हायरल

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली, तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असते. आयराने गेल्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी एंगेजमेंट केली होती, ज्याचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते. अशात अलीकडेच ती आलिशान कार सोडून ऑटोमधून प्रवास करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

आयरा खान ( ira khan) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आयार ऑटाेमधून प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पॅपराझींने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, आयरा कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून उन्हापासून वाचण्यासाठी तिने गाॅगल लावला आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर साेशल मीडिया युजर्सही भन्नाट कमेंट करू लागले आहेत. एका युजरने आयराचे कौतुक करत तिला डाउन टू अर्थ म्हटले आहे, तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “एक सिंपल स्टारकिड.” याशिवाय इतर अनेक युजर्सही आयराच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आयराच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर तिचा हाेणारा नवरा नुपूर जिम ट्रेनर आहे. नुपूरने आमिरशिवाय अनेक बॉलिवूड कलाकारांना फिटनेसचे प्रशिक्षण दिले आहे. आयराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आयरा खान पेशाने थिएटर डायरेक्टर आहे. तिने ‘मदिहा’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे, ज्यामध्ये युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच आहेत.(bollywood actor aamir khan daughter ira khan spotted travelling in auto rickshaw see video here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
इश्क का रंग सफेद! उर्वशी राैतेलाचा ‘व्हाईट फेदर गाऊन’मध्ये ग्लॅमरस अंदाज, फाेटाे व्हायरल

जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट

हे देखील वाचा