Sunday, April 14, 2024

अजय अन् सैफचे 1999 मधील न पाहिलेले फोटो, अभिनेत्याने पोस्ट करत दिला आठवणींना उजाळा

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे. अजय सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. आता त्याने इंस्टाग्रामवर शूटिंगदरम्यानचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा खास फोटो त्याच्या चाहत्याने क्लिक केला आहे. या फोटोसोबत अजयने आपल्या सहकारी कलाकारांना आठवत एक गोंडस कॅप्शनही दिले आहे.

अभिनेता अजय देवगण (ajay devgn) याने शेअर केलेला फोटो त्याच्या ‘कच्चे धागे’ चित्रपटाच्या सेटचा आहे, जो त्याच्या चाहत्याने त्याच्यासोबत शेअर केला आहे. फोटोमध्ये अजय आणि सैफ अली खान चित्रपटाच्या इतर युनिट्ससोबत बसलेले दिसत आहेत. 1999 मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले होते.

अजय देवगणचे कॅप्शन वाचून तो या चित्रपटाच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्याचे दिसते. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा फोटो मला एका चाहत्याने फॉरवर्ड केला होता. हा फोटो 1999 मध्ये ‘कच्चे धागे’च्या सेटवरून घेण्यात आला होता, ज्यामध्ये मी आणि सैफ धावत होतो. मनीषा कोईराला आणि नम्रता शिरोडकर आमच्या लीडिंग लेडीज होत्या. यासोबतच या चित्रपटात सदाबहार संगीत होते, जे नुसरत फतेह अली खान यांनी संगीतबद्ध केले होते. या चित्रपटाचा प्रवास खूप मजेशीर होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

विशेष म्हणजे अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ हा साऊथच्या ‘कैथी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात कार्थीची मुख्य भूमिका होती. अजय या चित्रपटात भोलेच्या भक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगणच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘आरआरआर’, ‘सिंगम’, ‘दे दे प्यार दे’, ‘गाेलमाल 5’, ‘दिलवाले’, ‘फुल और काटे’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिली. (bollywood actor ajay devgn got nostalgic shares kachche dhaage movie set photo with actor saif ali khan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोरियन बँड बीटीएसवर चढला ‘बेशरम रंग’, पाहा व्हायरल व्हिडिओ

अभिषेकला ट्रोल करणाऱ्यांना बिग बींनी दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाले, ‘तुझी खूप चेष्टा…

हे देखील वाचा