Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! ‘हेरा फेरी 3’ मधून अक्षय कुमार बाहेर; म्हणाला, ‘मी या चित्रपटाचा भाग…’

विनोदी चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘हेरा फेरी 3’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलीझ होण्या आधिच जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अक्षय कुमार(Akshay Kumar) ऐवजी कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) दिसणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. दुसरीकडे कथानक न आवडल्याने अक्षय कुमारने या सिनेमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खिलाडी कुमारचे चाहते नाराज झाले आहेत.

माध्यमांनी दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला,” हेरा फेरी 3 या चित्रपटाचा आता मी भाग नाही. मला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण या चित्रपटाचं कथानक मला फारसं न आवडल्याने मी या सिनेमाच्या टीममधून बाहेर पडलो आहे. प्रेक्षकांना जे पाहायला आवडेल तेच करायला मला आवडतं. त्यामुळेच मी या सिनेमातून माघार घेतली आहे”.

अक्षय कुमार ‘हेरा फेरी 3’ या सिनेमात दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळेच खिलाडी कुमारने चाहत्यांची माफी मागितली आहे. तो म्हणाला, ‘हेरा फेरी 3’ हा सिनेमा करत नसल्याचं दु:ख आहेच. पण मी तुमची फसवणूक करणार नाही. मला माफ करा”. दुसरीकडे अक्षय कुमारने ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटासाठी 90 कोटीचं मानधन मागितलं असल्याची चर्चा आहे. तर कार्तिक आर्यन मात्र 30 कोटींमध्ये हा चित्रपट करण्यासाठी तयार होता. त्यामुळे खिलाडी कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला निर्मात्यांनी पसंती दर्शवली.

‘हेरा फेरी-3’ या चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘फिर हेरा फेरी’ हा या चित्रपटाचा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला होता. हेरा फेरी या चित्रपटात परेश रावल यांनी बाबू भाई ही भूमिका तर अक्षयनं राजू ही भूमिका साकारली होती. सुनीलनं श्याम ही भूमिका साकारली होती. हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.(bollywood actor akshay kumar breaks silence on hera pheri 3)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खुशखबर! कट्यार घुसली काळजात 2 लवरच…, सुबोध भावेने शेअर केली पोस्ट

आलिया अन् रणबीरच्या राजकुमारीला भेटणे सोप्पं नाही, जोडप्याने भेटीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवली ‘ही’ अट

हे देखील वाचा