Tuesday, April 16, 2024

निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका, रुग्णालयात उपचार सुरू

बॉलिवूडमधून पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे. बाॅलिवूडला ‘बोल राधा बोल’, ‘दस’, ‘लाडला’, ‘भूत’ आणि इतर अनेक दमदार चित्रपट देणारे चित्रपट निर्माता नितीन मनमोहन जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत आहेत. चित्रपट निर्मात्याला शनिवारी (दि. 3 डिसेंबर)ला संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, चित्रपट निर्मात्याला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपट निर्माते नितीन मनमोहन उपचारांना प्रतिसाद देत आहेत, परंतु ते अजूनही धोक्याबाहेर नाहीत. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitin Manmohan (@nitinmanmohan)

सूत्राने सांगितले की, डॉक्टरांची टीम सतत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहे. आम्ही फक्त त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. संजय दत्तचे माजी सेक्रेटरी कलीम सतत त्याच्यासोबत आहे. कलीम दीर्घकाळापासून नितन मनमोहन यांच्यासोबत आहेत. मनमोहन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. काही जण त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत, तर काही त्याच्यासोबत आधीच हजर आहेत.

अभिनेता अक्षय खन्ना प्रकृती पाहण्यासाठी पाेहचले रुग्णालयात
अभिनेता अक्षय खन्नाला जसे नितिन मनमाेहन यांच्या प्रकृती विषयी कळले. ते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पाेहचले, माजी सेक्रेटरी कलीम म्हणाले, “अक्षय आणि नितिनजी यांच्यात खूप चांगले नाते आहे. ते त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे.”

प्रसिद्ध खलनायक मनमाेहनचा लेक नितीन मनमाेहन
नितीन मनमोहन हे प्रसिद्ध खलनायक मनमोहनचा मुलगा आहे, ज्यांनी ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ यासह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेकक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्याची पडद्यावरची उपस्थिती खूप ताकदवान आणि प्रभावशाली होती. (bollywood producer nitin manmohan suffers from a heart attack admitted to hospital)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने केला पाकिस्तानी मुलीचा डान्स कॉपी; भडकलेले नेटकरी म्हणाले, ‘तुझ्यापेक्षा तीच भारी’
वडिलांवरील आर्थिक संकटं आठवून रडला आमिर खान; म्हणाला, ‘अब्बाजानला पाहून खूपच…’

हे देखील वाचा