Tuesday, June 18, 2024

कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याच्या तयारीत अक्षय कुमार; म्हणाला, ‘माझ्यासाठी भारतच सर्वस्व…’

बॉलीवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. अनेकवेळा त्याला त्याच्या नागरिकत्वावरून सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले जाते. बराच काळ अशा टीकेला सामोरे गेल्यानंतर त्याने आता कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अक्षयने याबाबत मनमोकळेपणाने खुलासा केला आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

मुलाखतीदरम्यान आपल्या नागरिकत्वाबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, “भारतच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही साध्य केले आहे ते सर्व इथूनच केले आहे. या देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.” अक्षयने मुलाखतीदरम्यान पुढे सांगितले की, “एका वेळी त्याचे 15 हून अधिक चित्रपट फ्लॉप झाले होते, त्यामुळेच त्याला कॅनडाचे नागरिकत्व घेण्याची प्रेरणा मिळाली.”

तो म्हणाला, “मला वाटले माझे चित्रपट इथे चालत नाहीत त्यामुळे मी तिथे कामासाठी गेलो होतो. माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि त्याने इथे ये असे सांगितले. त्यानंतर मी अर्ज केला आणि नागरिकत्व मिळाले.” तो पुढे म्हणाला, “माझे फक्त दोन चित्रपट रिलीज व्हायचे बाकी होते. सुदैवाने दोन्ही सुपरहिट झाले. माझा मित्र म्हणाला, ‘परत जा आणि पुन्हा कामाला लाग’. त्यानंतर मला काम मिळू लागले. माझ्याकडे कॅनेडियन पासपोर्ट आहे हे मी विसरलो. हा पासपोर्ट बदलून घेण्याचा विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता, पण आता मी माझा पासपोर्ट बदलून घेण्यासाठी अर्ज केला आहे.”

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर त्याचा ‘सेल्फी’ हा चित्रपट आज म्हणजेच 24 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इमरान हाश्मीही देखील आहे. अक्षय कुमारसाठी गेले वर्ष चांगले गेले नाही. त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

अशात यावर्षी अक्षय अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अलीकडेच त्याने ‘हेरा फेरी 3’चा प्रोमो शूट केला. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत सुनील शेट्टी आणि परेश रावल देखील दिसणार आहेत. (bollywood actor akshay kumar talks about decision to renounce canadian passport said india is everything to me )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नवाजुद्दीनवर पत्नीने लावला बला’त्काराचा आराेप; ढसा ढस रडत व्यक्त केल्या वेदना

बाबो! साऊथची सुपरस्टार नयनतारा संपत्तीच्या बाबतीत आहे खरी बॉस लेडी, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती

हे देखील वाचा