Monday, June 24, 2024

बाबो! साऊथची सुपरस्टार नयनतारा संपत्तीच्या बाबतीत आहे खरी बॉस लेडी, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लेडी सुपरस्टार अशी ओळख असलेल्या नयनताराचे संपूर्ण जगभर कोट्यवधी फॅन्स आहेत. तिने तिच्या अभिनयाने आणि तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने सर्वांच्याच मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज नयनताराला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री अशी ओळख मिळाली असून, तिच्या या ओळखी मागे तिचे अथक प्रयत्न आणि अजोड मेहनत होती. नायंत्राच्या चित्रपटांबद्दल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्या संपत्तीबद्दल माहिती देणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nayanthara (@nayanthara.online)

मीडियाच्या २०२३ सालच्या रिपोर्टनुसार नयनताराकडे एकूण 25 मिलियन डॉलर अर्थात 200 कोटींची संपत्ती आहे. त्याची बहुतकरून कमाई ही चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. आजच्या घडीला नयनतारा एका सिनेमासाठी तब्बल 10 कोटी रुपये चार्ज करते. ती साऊथमधील सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे. एका माहितीनुसार नयनताराकडे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे, ज्यात हैदराबादमधील दोन घरांचा देखील समावेश आहे. त्या घरांची किंमत 15 कोटी असून ती घरं बंजारा हिल्स या परिसरात आहेत. जिथे अनेक मोठमोठ्या लोकांची घरं आहेत. तिच्याकडे चेन्नईमध्ये देखील दोन फ्लॅट असून त्यांची किंमत जवळपास 100 असल्याचे सांगितले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nayanthara (@nayanthara.online)

यासोबतच तिच्याकडे तिचे खासगी जेट देखील आहे. तिने हे जेट तिच्या प्रवासासाठी घेतले असून, यातून ती चेन्नई-हैदराबाद आणि चेन्नई-कोच्चि असा प्रवास करते. नयनतारा तनिष्क, टाटा स्काई, के ब्यूटी, उजाला आदी अनेक बड्या ब्रँडच्या एंडोर्समेंट करते. यासोबतच तिने ‘द लिप बाम कंपनी’मध्ये स्वतःचा एक स्किनकेयर ब्रँड देखील सुरु केला आहे. यासोबतच तिने ‘चाय वाले’ नावाने एक क्विक सर्व्हिस रेस्टोरंटची सुरुवात केली आहे. तिने तेलाच्या उद्योगातही खूप गुंतवणूक केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nayanthara (@nayanthara.online)

तत्पूर्वी नयनताराने 9 जून 2022 रोजी निर्माता आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न केले. मात्र आता सांगितले जात आहे की, ती चित्रपटांमध्ये काम करणार नसून नवऱ्याचे प्रोडक्शन हाऊस सांभाळणार आहे. लवकरच ती शाहरुख खानसोबत ‘जवान’ या सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा