Tuesday, June 18, 2024

अर्जुनला का आवडतात ‘श्रुती’ नावाच्या मुली? अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा, व्हिडिओ एकदा पाहाच

दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा 2‘ साठी चर्चेत आहे. पुष्पाच्या भाग दाेनचा ट्रेलर आल्यापासून चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता चांगलीच निर्माण झाली आहे. मात्र, पॅन इंडिया स्तरावर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सगळ्यात अल्लू अर्जुनच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन (allu arjun) याने स्नेहा रेड्डीसोबत प्रेमविवाह केला आहे. मित्राच्या लग्नात स्नेहा रेड्डीला पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनसाठी हे पहिल्या नजरेतील प्रेम होते. मात्र, स्नेहा हे अल्लू अर्जुनचे पहिले प्रेम नव्हते. हे स्वत: अभिनेत्याने सांगितले आहे.

खरेतर, अलीकडेच अभिनेता ‘इंडियन आयडॉल 2’च्या तेलुगू व्हर्जन रिअॅलिटी शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाला होता. यादरम्यान, श्रुती नावाच्या स्पर्धकाने त्याच्यासमोर परफॉर्मन्स दिला. अशात अल्लू अर्जुनने देखील तिची प्रशंसा केली आणि अभिनेत्याच्या पहिल्या प्रेयसीचे नावही उघड केले. अभिनेत्याने आपल्या पहिल्या प्रेयसीचे नावही श्रुती असल्याचे सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ahavideoin (@ahavideoin)

मंडळी अल्लू अर्जुनने 6 मार्च 2011 रोजी स्नेहा रेड्डीशी लग्न केले होते. लग्नानंतर अभिनेत्याला दाेन सुंदर मुलं आहेत अराह आणि अयान. अर्जुन आपल्या कुटुंबाशी संबंधित अनेक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. अल्लू अर्जुनने स्नेहासोबतचे देखील अनेक फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अभिनयासोबतच नृत्यात पारंगत असलेल्या अल्लू अर्जुनकडे दिग्दर्शक सुकुमार यांचा ‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट आहे, जाे लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. हा चित्रपट 2021मध्ये आलेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे. (bollywood actor allu arjun breaks silence on his first girlfriend pushpa actor reveals her name)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे बाप! डिलीव्हरीनंतर अवघ्या 18 दिवसात सुप्रसिद्ध अभिनेत्रीने कमी केलं वजन, पण कसं?
26 वर्षांनंतर माधुरी अन् करिश्मा दिसल्या एकत्र थिरकताना; व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले, ‘शाहरुख सर…’

हे देखील वाचा