Monday, February 10, 2025
Home टेलिव्हिजन बापरे बाप! डिलीव्हरीनंतर अवघ्या 18 दिवसात सुप्रसिद्ध अभिनेत्रीने कमी केलं वजन, पण कसं?

बापरे बाप! डिलीव्हरीनंतर अवघ्या 18 दिवसात सुप्रसिद्ध अभिनेत्रीने कमी केलं वजन, पण कसं?

लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान नुकतीच एका मुलाची आई झाली आहे. गौहर आणि तिचा पती जैद दरबार यांनी 10 मे रोजी बाळाचे स्वागत केले. अशात हे जाेडपे त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा जगत आहे. त्यांच्या या चिमुकल्याला चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत आहे. या सगळ्यामध्ये अभिनेत्रीने डिलीवरीनंतर अवघ्या काही दिवसातच वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

‘बिग बॉस 7’ फेम गाैहर (gauahar khan) हिने अलीकडेच तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. डिलीवरीनंतर 18 दिवसांत गौहरचे वजन खूप कमी झाले आहे. फाेटाेमध्ये अभिनेत्री पांढर्‍या स्लीव्हलेस टी-शर्टसह काळी पँट घालून तिचे स्लिम टमी फ्लॉंट करताना दिसत आहे. यासोबत गौहरने लिहिले की, “नो फिल्टर 18 डेज पोस्टपार्टम.”

याआधीही अभिनेत्रीने तिचा फोटो शेअर करून लिहिले होते की, “डिलीवरीनंतर 10 दिवसात तिने 10 किलो वजन कमी केले आहे”, यासाेबतच अभिनेत्रीने असेही म्हटले हाेते की, “तिला आणखी 6 किलो वजन कमी करायचे आहे.” अभिनेत्रीच्या या परिवर्तनाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे आणि तेव्हापासून गौहरने हे कसे केले हे जाणून घेण्यासाठी  चाहते उत्सुक आहे.

gauahar khan
Photo Courtesy Instagramgauaharkhan

या सगळ्यात अभिनेत्रीचा डायट प्लान समोर आला आहे. चला जाणून घेऊया गौहरने कोणता आहार फॉलो करून तिचे वजन कमी केले आहे.

गौहर खान तिच्या दिवसाची सुरुवात थंड दुधात सुका मेवा आणि फळे घालून करते, ज्यामुळे तिला दिवसभर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यासाेबतच अभिनेत्री आहारात साधे जेवण घेते. गौहरला संध्याकाळी पोहे आणि पॅनकेक खायला आवडतात, नाहीतर ती कमी तेलकट पदार्थ खाते. गौहर रात्री 8 वाजण्यापूर्वी तिच्या जेवणाची खात्री करते आणि चपात्या व ग्लूटेन-युक्त पदार्थ टाळते. असा अभिनेत्रीचा डायट प्लान आहे, जाे तिला तंदुरुस्त राहण्यास मदत करते.(tv actess gauahar khan weight loss after 18 days of delivery know her diet routine )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

माेठी बातमी! कार्यक्रमाच्या आयाेजकांवर गुन्हा दाखल केल्याबाबत गाैतमी पाटीलचं माेठं वक्तव्य म्हणाली,’माझा दोष…’

हे देखील वाचा