Friday, December 1, 2023

अनिल कपूर लेकीच्या वॉर्डरोबमधून चाेरताे ‘या’ गाेष्टी, स्वत:च खुलासा करत म्हणाला…

बॉलिवूडचा सदाबहार स्टार अनिल कपूर वयाच्या 66 व्या वर्षीही आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सध्या तो त्याच्या डिस्ने प्लस हॉटस्टार वेब सीरिज ‘द नाईट मॅनेजर’मुळे चर्चेत आहे. अशात अनिल कपूरने आपल्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलण्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हीही हसू आवरू शकणार नाही. असे काय बाेलला अभिनेता? चला जाणून घेऊया…

नुकत्याच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर (anil kapoor) याने सांगितले की, “1997 मध्ये ‘विरासत’ चित्रपटात मी जी ट्राउजर घातले होते. ते मी जॅकी श्रॉफकडून घेतले होते. जॅकीने ते एकदा घातले होते, मग मी त्याला सांगितले की, मला ते हवे आहे, म्हणून त्याने ते मला दिले. गेल्या 20 वर्षांपासून मला ताे ते ट्राउजर मागत आहे, पण तरीही ते माझ्याजवळ आहे. एकदा मी त्याला भेटलो तेव्हा मी त्याला सांगितले की, मी तुला ट्राउजर देणार नाही. कारण, ही खूप इमोशनल गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मी ते ट्राउजर पाहते तेव्हा मला त्यांची आठवण येते.”

अनिल कपूरने पुढे सांगितले की, “मी माझ्या मुलाचा शर्ट देखील घालतो, यासाेबतच मी कधीकधी माझ्या मुली सोनम कपूर आणि रिया कपूर यांच्या वॉर्डरोबमधूनही काही गाेष्टी काढतो.” अभिनेता म्हणाला, “माझे कॅरेक्टर मनोरंजक बनवण्यासाठी मी कोणाकडूनही गोष्टी चोरू शकतो. मी सोनमपासून ते रियाच्या वॉर्डरोबमधील सनग्लासेस चोरले आहेत. आजकाल असे बरेच कपडे आहेत, जे युनिसेक्स आहेत, जसे की, जॅकेट-कोट इ. आम्ही सगळे एकमेकांचे कपडे घालतो.”

अभिनेत्याच्या वर्क फ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर अनिल कपूर ‘द नाईट मॅनेजर’ या ब्रिटिश वेब सीरिजचे हिंदी रिमेक करत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत अनिल कपूर खलनायक बनला आहे. अनिल कपूरच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे.(bollywood actor anil kapoor revealed he stolen things from sonam kapoor and daughter rhea closet)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार

पत्नी आलियाच्या आराेपांवर नवाजुद्दीनने साेडले मौन; म्हणाला, ‘आईच्या संपत्तीवर माझा…’

हे देखील वाचा