बाॅलिवूड अभिनेता अनुपम खेर लवकरच ‘शिवशास्त्री बल्बोआ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री नीना गुप्ता आणि नर्गिस फाखरी देखील आहेत. हा चित्रपट सध्या लोकांमध्ये प्रचंड चर्चेत असून प्रत्येकजण या चित्रपटाची वाट पाहत आहे. अशातच आता या चित्रपटाशी संबंधित कलाकार पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. खरे तर हे तिन्ही स्टार्स त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना डब्बावाल्यांना जेवण देताना दिसत आहेत.
यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नर्गिस फाखरी (nargis fakhri ), नीना गुप्ता (neena gupta), अनुपम खेर (anupam kher) आणि चित्रपटातील इतर कलाकार एका ठिकाणी टेबलवर बसलेल्या डब्बावाल्यांना जेवण देताना दिसत आहेत. यानंतर अनुपम खेर देखील त्या सर्वांसोबत जेवायला बसले आहेत.
View this post on Instagram
अनुपम खेर, नर्गिस आणि नानी गुप्ता यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. ते व्हिडिओवर विविध गोष्टी लिहिताना दिसत होता. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मला वाटले की, हा व्हिडिओ अनंत अंबानींच्या साखरपुड्याचा आहे.’ याशिवाय कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले की, ‘त्याने हे काम फुकट केले नसेल.’ त्याच वेळी, तिसऱ्या युजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट केली की, ‘चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काय-काय करतात.’ तर एका चाहत्याने व्हिडिओवर कमेंट केली की, ‘मला वाटले की तो एक सामान्य माणूस आहे.’
याशिवाय या व्हिडिओवर कमेंट करताना लोकांनी चित्रपटातील स्टारकास्टच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.(bollywood actor anupam kher neena gupta nargis fakhri were seen serving food to dabbawalas in mumbai with their own hands fans take class)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आई माझ्यासाठी सर्वस्व होती..’, किरण माने यांना आईच्या निधनानंतर केला होता राखी सावंतने फोन
रमेश देव यांना ‘देव’ हे आडनावच राजश्री शाहू महाराजांनी दिलं होतं, पाहा काय आहे यामागची स्टोरी