Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

रवी किशनची लेक बनली’अग्निवीर’, अनुपम खेर कौतुकाचा वर्षाव करत म्हणाले, ‘तिचे हे पाऊल…’

अभिनेते-राजकारणी रवी किशन यांची 21 वर्षीय मुलगी इशिता शुक्ला आता देशाची सेवा करणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ती लवकरच संरक्षण दलात सामील होणार आहे. आपल्या मुलीच्या या यशाबद्दल रवी किशनला खूप अभिमान वाटत आहे. त्याच वेळी, सर्व सेलिब्रिटी देखील अभिनेत्याचे अभिनंदन करत आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनीही रवी किशन यांच्या मुलीचे एक नाेट लिहून कौतुक केले आहे.

अनुपम खेर (anupam kher) यांनी रवी किशन (ravi kishan) यांची मुलगी इशिता शुक्ला (ishita shukla) हिचे कौतुक करण्यासाठी एक नाेट लिहिली आहे. अनुपम यांनी लिहिले की, ‘इशिताचे यश इतर मुलींसाठी एक उदाहरण बनेल आणि त्यांना प्रेरणा देईल.’ अनुपम यांनी गुरुवारी (29 जुन)ला सकाळी ट्विटरवर रवी किशन आणि त्यांची मुलगी इशिता शुक्ला यांचा एक छोटासा फोटो शेअर केला आणि आपल्या नाेटमध्ये लिहिले, “माझा प्रिय मित्र रवी किशन, तुझी मुलगी इशिताबद्दल प्रेरणादायी बातमी वाचली! ती अग्निवीर योजनेंतर्गत संरक्षण दलात सामील झाली आहे. याचा मला आनंद आहे आणि अभिमान आहे. इशिताला माझे प्रेम आणि आशीर्वाद द्या. तिला सांगा की, तिचे हे पाऊल लाखो मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण बनेल. जय हिंद!”

रवी किशनने अलीकडेच इशिताबद्दलची पोस्ट रिट्विट करून या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी यापूर्वी ट्विटरवर इशिताच्या प्लॅनिंगचा खुलासा केला होता, त्यांनी ट्विट केले होते की, “माझी धाडसी मुलगी इशिता शुक्ला गेल्या 3 वर्षांपासून आपल्या देशाची सेवा करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. ती दिल्ली संचालनालयाच्या 7 गर्ल्स बटालियनची कॅडेट आहे, जी या कडाक्याच्या थंडीत प्रशिक्षण घेत आहे आणि कर्तव्याच्या मार्गावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी धुक्याशी लढत आहे.”

अभिनेत्याने असेही शेअर केले की, “माझी मुलगी इशिता शुक्ला हिने सकाळी मला सांगितले की, तिला अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात सामील व्हायचे आहे, मी म्हणालो पुढे जा बेटा.”

रवी किशनने बालपणीची मैत्रीण प्रीती किशनसोबत लग्न केले आहे. या जोडप्याला तीन मुली, रिवा, तनिष्क, इशिता आणि एक मुलगा सक्षम आहे. त्यांची चारही मुले चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत.(Bollywood actor anupam kher proud of bhojpuri actor bjp mp ravi kishan daughter ishita shukla on joining army)

हे देखील वाचा