Tuesday, May 21, 2024

नातू करण देओलच्या रिसेप्शनमध्ये धर्मेंद्रने केले सर्वांना भावूक, अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडिओ

अभिनेात धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलने 18 जून रोजी मुंबईत त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्न केले. त्याच दिवशी संध्याकाळी करण-द्रिशाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशात मंगळवारी (27 जुन)ला अनुपम खेरने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये धर्मेंद्र त्यांचे मित्र अनुपम आणि राज बब्बर यांच्यासाठी कविता म्हणताना दिसत आहे. धर्मेंद्रच्या या कवितेचे वर्णन अनुपम खेर यांनी केले आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर (anupam kher) यांनी लिहिले, “जेव्हा आपण मोठे होतो. मग ते वय असो किंवा स्टेटस. आपल्याला मागे सोडलेल्या घराची आठवण येते… ज्या घरामध्ये आपण आपले बालपण घालवले. त्या दिवशी मी माझा मित्र सनी देओलचा मुलगा करण याच्या लग्नासाठी थोडा लवकर पोहोचलो, त्यामुळे मला धर्मेंद्रजीसाेबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. धर्मेंद्रजी यांनी लहिलेल्या कवितेच्या काही ओळी ते म्हणताना दिसले, जे माझ्या आणि राज बब्बरजींच्या हृदयाला भिडणारे होते. माझ्या सांगण्यावरून त्यांनी ही नझम रेकॉर्ड करायला होकार दिला. तुम्ही पण ऐका. तुम्हाला तुमचा प्रियकर, तुमचे बालपण, तुमचे घर आणि तुमच्या आईची आठवण येईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

यापूर्वी अनुपम खेर यांनी करण-द्रिशाच्या रिसेप्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामध्ये ते आमिर खान, सलमान खान, सनी देओलसोबत दिसले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

करण आणि द्रिशा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स 15 जूनपासून सुरू झाले आणि 18 जून रोजी दुपारी दोघेही विवाहबंधनात अडकले. दिशा दुबईतील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मॅनेजर आहे, तर करणने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अपने 2’आहे.(actor dharmendra recites poem at karan deol drisha acharya reception anupam kher shares video )

अधिक वाचा:
Birth Anniversary:घरातूनच मिळाले संगीताचे बाळकडू, जाणून घ्या आरडी बर्मन यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी
प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अन्नातून विषबाधा झाल्याने निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

हे देखील वाचा