अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीला खुशी अन् जान्हवीसह ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी


बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर शनिवारी (२६ जून) आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी अनेक कलाकार आणि त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहेत. यातच अर्जुन कपूरने त्याच्या परिवारासोबत आणि काही खास मित्रांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. अर्जुन कपूरसाठी 25 जूनच्या रात्री मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. यामध्ये अर्जुन कपूरच्या बहिणी अंशुला, जान्हवी आणि खुशी कपूरसोबत परिवारातील काही लोक आणि बॉलिवूडमधील त्याच्या काही जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. (Bollywood actor Arjun Kapoor celebrate his 36 th birthday)

अर्जुन कपूरच्या या पार्टीमध्ये खुशी कपूर बहीण जान्हवीसोबत आली होती. यामध्ये खुशीने तिच्या अंदाजाने सर्वांचे मन जिंकले. अभिनेता रणवीर सिंग देखील अर्जुन कपूरच्या या पार्टीमध्ये त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता.

तसेच रणबीर कपूर, आलिया भट्ट यांनी देखील या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा हे देखील पार्टीला उपस्थित होते. अर्जुन कपूरची बहीण अंशुला देखील तिच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी या पार्टीला आली होती. या सगळ्या स्टार्सने मिळून अर्जुन कपूरच्या पार्टीमध्ये चांगलीच धमाल केलेली दिसत आहे. यावेळी अर्जुन कपूर देखील खूप खुश होता.

अभिनेता अर्जुन कपूरच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले आहे.

त्याने ‘सरदार ऑफ ग्रँडसन’, ‘संदीप और पिंकी फरार’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘2 स्टेट्स’, ‘की ऍंड का’, ‘गुंडे’, ‘इश्कजादे’, ‘पानिपत’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तो बॉलिवूड डान्सर आणि मॉडेल मलायका अरोरासोबत रिलेशनमध्ये आहे. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. त्या दोघांना अनेक वेळा स्पॉट केले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’


Leave A Reply

Your email address will not be published.