Sunday, July 26, 2026
Home बॉलीवूड आयुष्यमान खुरानावर काेसळला दु:खाचा डाेंगर, कुटुंबातील माणूस कायमचा हरपला, अभिनेत्याचे अश्रू थांबेनात

आयुष्यमान खुरानावर काेसळला दु:खाचा डाेंगर, कुटुंबातील माणूस कायमचा हरपला, अभिनेत्याचे अश्रू थांबेनात

चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराना याच्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. खरे तर, अभिनेत्याचे वडील आणि प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे निधन झाले आहे. पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. माध्यमातील वृत्तानुसार, पी खुराना हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. अशात दोन दिवसांपूर्वी त्यांना पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशात ही दुःखद बातमी समोर येताच इंटरनेट विश्वात खळबळ उडाली आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील स्टार्स अभिनेत्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

आयुष्यमान आणि त्याच्या कुटुंबियांना धीर देत अभिनेता सुनील शेट्टी यांनी ट्विट केले की, ‘देव तुम्हाला हे मोठे नुकसान भरून काढण्याची शक्ती देवो.

अभिनेता अपरशक्ती खुराना यांच्या प्रवक्त्याकडून अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, ‘आम्हाला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी 10:30 वाजता मोहाली येथे दीर्घ आजाराने निधन झाले. या वैयक्तिक नुकसानीच्या वेळी तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. अभिनेता आयुष्मान खुरानाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याचे वडील त्याचे ‘लाइफ कोच आणि मेंटॉर’ होते. यासाेबतच आयुष्मानने ज्योतिषावर विश्वास नसल्याचेही स्पष्ट केले होते.(bollywood actor ayushmann khurrana father and famous astrologer p khurana dies )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमध्ये अतुट विश्वास; नावं पाहून तुम्हीही म्हणाल ‘जोडा असावा तर असा’

रेल्वेत मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी पाहून मराठी अभिनेत्याने व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला संताप

हे देखील वाचा