Tuesday, July 9, 2024

इतक्या वर्षानतर अखरे आयुष्यमानने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा; म्हणाला, ‘चित्रपटांशिवाय जगू शकतो पण…’

आयुष्मान खुरानाची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट देऊन  आयुष्यमानने बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. तसेच या अभिनेत्याने इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यामध्ये ‘विकी डोनर‘, ‘बधाई हो‘, ‘अंधाधुन‘, ‘ड्रीम गर्ल‘ यांसारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. अशात आता या अभिनेत्याने खुलासा केला आहे की, त्याला चित्रपटांपेक्षा जास्त गाणी आवडतात.

खरे तर, नुकताच आयुष्मान खुराना (ayushmann khurrana) एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यादरम्यान त्याने त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्याने सांगितले की,’तो विविध चित्रपट करतो, परंतु त्याला चित्रपटांपेक्षा संगीत अधिक आवडते.’ अशा प्रकारे, तो एक असा कलाकार आहे जो त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या संगीतावर अधिक लक्ष केंद्रित करतो.

त्याच्या संगीताच्या निवडीबद्दल बोलताना आयुष्मान खुरानाने सांगितले की, ‘संगीत हे त्याचे पहिले प्रेम आहे. ताे नियमित  नवीन कलाकरांचा शाेध घेता, ज्यांना ताे एकू शकेल. त्याला इंडी संगीत, गझल, सूफी हे फार आवडते.’ चित्रपट निर्माता होण्याबद्दल आयुष्मान म्हणाला की, ‘लोक असे मानतात की, जर त्याला कलेचे ज्ञान असेल, तर तो निर्माता देखील असेल.’ मात्र, यावर अभिनेत्याचे मत आहे की, ‘जर तुम्ही खूप चित्रपट बघितले, तर तुम्हाला चित्रपटांबद्दल बरेच ज्ञान असू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही ते बनवू शकता.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्यमान आपला मुद्दा पुढे करत म्हणाला, अभिनेता किंवा कलाकार होण्यासाठी जीवन जगण्याची गरज असते. जीवनात विविध अनुभव आहेत आणि विविध लोकांना भेटण्याची गरज आहे, म्हणून जेव्हा तो लहान शहरांमध्ये प्रवास करतो तेव्हा तो स्थानिक लोकांशी संवाद साधतो आणि त्यांच्याशी मैत्री करतो, जे त्याला पडद्यावर अभिनय करण्यात मदत करतात, विविध भूमिका साकारण्यास मदत करतात.’ असे अभिनेत्यााने सांगितले.(Bollywood actor ayushmann khurrana reveals songs are his first love he said i can live without movies but not without music )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इलियाना डिक्रूझने सांगितली प्रेग्नेंसीची वेदना; म्हणाली, ‘जेव्हा तुम्हाला झोपायचे असते, पण…’

तुर्किश स्टार बुराक डेनिझ पहिल्यांदाच आला भारतात, अभिनेत्याचा स्वॅग पाहून चाहेत अवाक्

हे देखील वाचा