बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘अॅन ऍक्शन हिरो‘ चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट समीक्षकांच्या मते हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तर याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आयुष्मानने माध्यमांशी संवाद साधला आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या. आयुष्यमानचे वडिल पी. खुराना यांनी अभिनेत्याला लहाणपणी खूप मारहाण केली होती, काय आहे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया…
अभिनेता आयुष्मान (ayushmann khurrana) याने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांने त्याच्या बालपणीच्या गाेष्टी सांगितल्या. यादरम्यान आयुष्यमान म्हणाला की, “त्याचे वडील खूप कडक होते आणि लहानपणी त्याला खूप मारायचे.” संवादादरम्यान तो गमतीने म्हणतो की, “नार्थमध्ये ज्याला आई-वडिलांनी चापट मारली नाही, ज्याने चप्पल खाल्ली नाही, त्याच्याशिवाय त्याला उठता येत नाही. तिथं सहसा पालक आपल्या मुलांना मारतात कारण, ते त्यांच्या संगोपनाचा एक भाग मानतात.”
आयुष्मान पुढे म्हणताे की, “जेव्हा त्याचे वडील मुंबईत आले तेव्हा त्यांनी कुणाला तरी सांगितले की, त्यांचा मुलगा एक दिवस मोठा स्टार बनेल. मात्र, त्यावेळी अभिनेत्याला याची अजिबात माहिती नव्हती. जेव्हा त्याला हे कळले तेव्हा तो घाबरला की, आपण यशस्वी व्यक्ती बनू शकलो नाही तर काय होईल?”
मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याला विचारण्यात आले की, “त्याला इंडस्ट्रीत काम कसे मिळाले आणि जेव्हा तो चंदीगडहून बॉम्बेला गेला तेव्हा त्याच्या मनात काय होते?” यावर आयुष्मान म्हणाला, “माझीही शाहरुख खान सारखी अवस्था हाेती, जेव्हा मी मुंबईला आलाे तेव्हा मी ठरवले की, जोपर्यंत मला काही काम मिळत नाही, मी समुद्राकडे पाहणार नाही, मी बीचवर जाणार नाही. तीन-चार दिवसातच मला एका रेडिओ स्टेशनवरून फोन आला.”
सण 2004मध्ये आयुष्मान ‘रोडीज’ सीझन 2 चा विजेता ठरला आहे. हा शो जिंकल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली, इतकेच नाही, तर यानंतर त्याने रेडिओ जॉकी आणि अँकरिंग करायला सुरुवात केली. गेल्या शुक्रवारी, 2 डिसेंबरला आयुष्मानचा ‘अॅन ऍक्शन हिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (bollywood actor ayushmann khurrana shares childhood memories said he was beaten by his father p khurrana)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी दिलजीतचा सरकारवर निशाणा; म्हणाला, ‘100% सरकारची…’
भोजपुरीची स्टार अभिनेत्री बनली मिया खलिफा, लेटेस्ट व्हिडिओवरून अक्षरा चाहत्यांकडून झाली ट्रोल










