गोविंदाच्या पत्नीचा ५० वा वाढदिवस मुलांनी केला दणक्यात साजरा; सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

Bollywood actor govinda's wife celebrate her 50 th birthday, photo get viral


बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेता म्हणजे गोविंदा. त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो तो शेअर करत असतो. गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा ही देखील चर्चेत असते. सुनिताने बुधवारी (16 जून) तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मिळून तिचा वाढदिवस साजरा केला आहे. सुनिताने तिच्या वाढदिवसाचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुनिताची आई आणि भाऊ देखील दिसत आहे.

गोविंदा आणि सुनिता यांची मुले टीना आणि यशवर्धन यांनी त्यांच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात कोणतीच कमी ठेवली नाही. यानिमित्त त्यांनी घरी एक छोटीशी पार्टी ठेवली होती.

सुनिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिला दोन्ही बाजूने तिची मुलं गालावर किस करताना दिसत आहेत. यासोबतच तिने लिहिले आहे की, “मुलांसोबत माझा 50 वा वाढदिवस.”

सुनिता तिच्या वाढदिवशी ती खूपच सुंदर दिसत होती. तिने लाईट ब्राऊन कलरचा गाऊन घातला होता. ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की, ती 50 वर्षाची झाली आहे. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडतात.

गोविंदा आणि सुनिताने 11 मार्च, 1987 रोजी लग्न केले होते. ते दोघेही वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. त्यांच्या मुलासोबत अनेक ठिकाणी त्यांना स्पॉट केले आहे. तसेच अनेक वेळा ते फॅमिली फोटो शेअर करत असतात. गोविंदा हा सुनितावर खूप प्रेम करतो. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्यातील प्रेम कमी झाले नाही.

गोविंदाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो खास करून त्याच्या डान्स स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. तो शेवटचा ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित


Leave A Reply

Your email address will not be published.