एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला


मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हे नेहमीच त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. त्यांचा फिटनेस पाहून कोणीही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. त्यांचा फिटनेस सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांचे व्यायाम करताना फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या वयातही त्यांचा फिटनेस पाहून त्यांचे चाहते हैराण होतात. अशातच त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मिलिंद सोमण यांनी शेअर केलेला या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यांनी फिटनेस थेरपीसाठी शर्टलेस दिसत आहे. तसेच त्यांनी व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते व्यायाम करताना दिसत आहे. ते या व्हिडिओमध्ये 40 पुश अप्स मारताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते लागोपाठ 39 पुश अप्स मारतात. त्यांनतर काही सेकंदाचा आराम करतात नंतर ते कॅमेराकडे पाहून हसतात आणि शेवटचाही पुश अप्स मारतात.

त्यांना हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “बेसिक काहीही विसरू नका. माझ्याकडे जेव्हा व्यायाम करण्यासाठी पूर्ण वेळ नव्हता, तेव्हा मी काही मिनिट का होईना पण व्यायाम करत होतो. मी 60 सेकंदात किती करू शकतो हे पाहतोय.”

त्यांनी पुढे लिहिले की, “वेळ, जागा, साहित्य या सगळ्याचे काही कारण चालत नाही. केवळ एका मिनिटात तुमच्या पुश अप्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा. हे सुरुवातीला खूप कठिण आहे. परंतु याचा शेवट खूप चांगला होतो.”

त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यांच्या पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी त्यांच्या पासून प्रेरणा घेतली आहे. सगळेजण कमेंट करून त्यांच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत. ते त्यांच्या फिटनेस बाबत खूप सिरियस आहेत. मागे एकदा एका महिलेने त्यांच्याकडे सेल्फी मागितला होता तेव्हा त्यांनी त्या महिलेला भर बाजारात पुश अप्स करायला लावले होते. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला सेल्फी दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बादशाहच्या ‘पानी पानी’ गाण्याला ‘तारक मेहता…’च्या बापूजींचा तडका; पाहून तुम्हीही खदखदून हसाल

-पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर जया बच्चन यांनी म्हटले होते ‘असे’ काही; ऐकून ऐश्वर्या लागली होती रडू

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट


Leave A Reply

Your email address will not be published.