×

यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित

मागील अनेक काळापासून भोजपुरी गाण्यांनी सोशल मीडियावर, यूट्यूबवर चांगलाच धमाका केला आहे. प्रत्येक प्रदर्शित होणारे भोजपुरी गाणे हे हिट होणारच याची खात्री सर्वानाच असते. भोजपुरी गाण्यांनी आजच्या काळात त्यांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. आकर्षक संगीत, हटके शब्द असणारी ही उडत्या चालीची गाणी आजच्या तरुणाईला सुद्धा खूप आवडतात.

भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार असलेला अरविंद अकेला कल्लू मागच्या काही काळापासून भोजपुरी इंडस्ट्री गाजवताना दिसत आहे. तो आणि त्याचे गाणे प्रेक्षकांना खूप आवडतात. त्याचे कोणतेही गाणे प्रदर्शित झाले तरी त्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळणारच हे आधीच गृहीत धरले जाते. अरविंद अकेलाचे नवीन भोजपुरी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गाण्याचे नाव आहे ‘चुम्मा देहब ठोरवा में’.

नुकतेच हे गाणे किरण म्यूजिक एंटरटेनमेंटच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. या गाण्यात सुपरस्टार अरविंद अकेला कल्लू असून सोबत भोजपुरी अभिनेत्री तृषाकर मधु दिसत आहे. या गाण्यात अरविंद आणि तृषाकर या दोघांची जोडी जबरदस्त दिसत आहे. या दोघांची या गाण्यातली केमिस्ट्री कमाल असून, त्यांचा रोमान्स देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

या गाण्याला अरविंद अकेला कल्लू आणि भोजपुरी गायिका अंतरा सिंह प्रियांका यांनी गायिले असून, चंदन यदुवंशीने लिहिले आहे. या हिट गाण्याला संगीत छोटू रावतने दिले असून, गाण्याचे व्हिडिओ डायरेक्टर पंकज सोनी आहे. अंतरा आणि अरविंद यांनी या आधी गायिलेली सर्व गाणी हिट ठरली असल्याने हे गाणे देखील लोकप्रियेचे रेकॉर्ड करेल यात शंका नाही.

याआधी अरविंद अकेला कल्लू आणि तृषाकर मधु यांचे ‘झिझिरियां’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला खूप कमी वेळात १ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. या गाण्यात कलाकार, गायक, संगीतकार अशा सर्वच लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे हे गाणे देखील यशाचे नवीन रेकॉर्ड करणार यात शंका नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बादशाहच्या ‘पानी पानी’ गाण्याला ‘तारक मेहता…’च्या बापूजींचा तडका; पाहून तुम्हीही खदखदून हसाल

-पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर जया बच्चन यांनी म्हटले होते ‘असे’ काही; ऐकून ऐश्वर्या लागली होती रडू

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

Latest Post