Saturday, June 29, 2024

मुंबई सोडण्यापूर्वी ऋतिकने पॅपराझींसमाेर साबा आझादला केले किस, व्हिडिओ व्हायरल

ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे बी-टाऊनची प्रसिद्ध जोडी आहे. त्यांची जोडी चाहत्यांमध्ये चांगलीच हिट आहे. दोघांना आतापर्यंत अनेक पब्लिक इवेंट्समध्ये एकत्र पाहिले गेले आहे. ऋतिक आणि सबा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात आता या जोडप्याचा एक क्यूट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

ऋतिक रोशन (hrithik roshan) सध्या ‘फाइटर’ आणि ‘वॉर 2’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट 2024 पर्यंत प्रदर्शित होणार आहेत. यादरम्यान, अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावर दिसत आहे. व्हिडिओमध्ये, ऋतिक विमानतळावर पोहोचला असून फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी आपल्या लेडी लव्हला म्हणजेच सबा आझादला गोड किस करताना दिसत आहे. त्याचा हा गोड हावभाव पाहून चाहते खूप खूश आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या डेटिंगच्या अफवांना तेव्हा उधाण आले, जेव्हा दोघे डिनर डेटवर एकत्र दिसले हाेते. साबा आझादने ऋतिकच्या फॅमिली गेट टुगेदरलाही हजेरी लावली होती. यासाेबतच करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीतही दोघे हातात हात घालून येताना दिसले तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या अफवा संपुष्टात आल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

ऋतिकने लग्नाच्या 14 वर्षांनतर पहिल्या पत्नीला दिला घटस्फाेट
ऋतिक रोशनने सन 2000मध्ये बालपणीची मैत्रीण सुजैन खानशी लग्न केले हाेते. ऋतिकचे सुझैनसोबतचे हे लव्ह मॅरेज होते. मात्र, हे लग्न केवळ 14 वर्षे टिकले. यानंतर दोघेही वेगळे झाले. (bollywood actor hrithik roshan and saba azad kiss of love at mumbai airport)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे तीन वेगळे सण असतात’ शशांक केतकरने ‘होळी’च्या ‘त्या’ पोस्टमधून घातले लोकांच्या डोळ्यात अंजन

करियरच्या पहिल्या 10 वर्षांमध्ये अक्षय कुमारले कमावले होते केवळ ‘इतके’ रुपये, स्वतःच केला खुलासा

हे देखील वाचा